Actor Quit Films To Become Maulana : गेल्या काही काळात धर्मासाठी बॉलिवूडमधील झायरा वसीम ते सना खानसह अनेक स्टार्सने रामराम ठोकलंय. या यादीत असं एक नाव आहे ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. 1991 मधील अजय देवगण याचा पहिला वहिला चित्रपट 'फूल और कांटे' मधील खलनायक यानेदेखील बॉलिवूडचा निरोप घेतला. या अभिनेत्याचादेखील हा पहिला चित्रपट होता. त्याने अजय देवगणसोबतच नाही तर सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि सलमान खान या बड्या अभिनेत्यांसोबतही काम केलंय. आम्ही बोलत आहोत ते आरिफ खान या कलाकाराबद्दल.
'फूल और कांटे' या चित्रपटात मधू आणि अजय देवगणची जोडी खूप आवडली होती. अजय देवगणचं आपल्या दमदार अभिनयने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्या काळात हा चित्रपट खूप गाजला होता. खास करुन तरुणांमध्ये अजय देवगणच्या स्टाइलची चर्चा झाली होती. याच चित्रपटातील खलनायक होता आरिफ खान. त्याने 90 च्या दशकात अनेक चित्रपटात काम केलं पण त्याला सिनेसृष्टीची दुनिया काही जमली नाही. त्याला चित्रपटात फार काही चांगले काम मिळत नव्हतं.
आरिफ खानने अजय देवगणच्या 'फूल और कांटे' या चित्रपटात रॉकीची भूमिका साकारली खरी, प्रेक्षकांनी त्याच कौतुकही केलं. त्यानंतर तो सुनील शेट्टी, सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासोबत 'मोहरा', 'वीरगती' आणि 'दिलजले'सह अनेक चित्रपटांमध्ये झळकला. या अभिनेत्याबद्दल अजून एक गोष्ट आहे ती खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याने बॉलिवूडमध्ये तर काम केलंच शिवाय हॉलिवूडमध्येही त्याने अभिनयाचं कौशल्य दाखवलंय. 2007 मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूड चित्रपट 'अ माईटी हार्ट'मध्ये त्याने अँजेलिना जोलीसोबत स्क्रीन शेअर केलीय.
अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर, एक दिवस अचानक बॉलिवूडला अलविदा केला. त्याने अभिनय सोडून धर्माचा मार्ग स्विकारला. तो इस्लाम धर्माचा प्रचारक झाला. कोरोना संकटात आरिफ खानने एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याला ओळखणंही कठीण झालं होतं. वाढलेली दाढी, पांढरा कुर्ता...आरिफ नवीन लूक पाहून नेटकरी हैराण झाले होत. इस्लाम धर्माचं पालन करण्यासाठी त्याने सिनेसृष्टीचा निरोप घेतल्याच सांगितलं. तो आता मौलाना बनला असून तो लोकांना इस्माल धर्माचे तत्व शिकतो.