किसचा सीन कट केल्यानंतर विनोद खन्ना अभिनेत्रीला सोडत नव्हता, अखेर मेकअप रुममध्ये लपली

दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर देखील विनोद खन्ना किस करत राहिला

Updated: Apr 30, 2021, 08:05 PM IST
किसचा सीन कट केल्यानंतर विनोद खन्ना अभिनेत्रीला सोडत नव्हता, अखेर मेकअप रुममध्ये लपली

मुंबई : हँडसम हंक विनोद खन्नासोबत बॉलिवूड अभिनेत्री रोमँटिक सीन करताना घाबरायच्या. विनोद खन्नाचा माधुरी दीक्षितसोबत किसिंग सीन लाईमलाईटमध्ये आला होता. पण ही त्यांची पहिली वेळ नव्हती. याआधी देखील डिंपल कपाडियासोबत रोमँटिक सीन चित्रित करताना विनोद खन्नाने हे केलं आहे. महेश भट्ट दिग्दर्शित 'मार्ग' या चित्रपटात विनोद आणि डिंपल यांच्यात किसिंग सीन चित्रीत केला जाणार होता.

ज्यामध्ये दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर देखील विनोद डिंपलला किस करत होते. डिंपल खूप घाबरली. तिने कसं तरी स्वत: ची यातून मुक्तता केली आणि मेकअप रूममध्ये लपून बसली. यावेळी डिंपल महेश भट्टवर खूप नाराज झाली. मग त्यांनी डिंपलला समजावून सांगितले की विनोद खन्ना दारूच्या नशेत होता. त्यामुळे तो कट समजू शकला नाही. मात्र डिंपल विनोदवर ऐवढी नाराज होती तेवढीचं दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावरही.  हा चित्रपट 'प्रेम धर्म'च्या नावाने चार वर्षानंतर प्रदर्शित झाला, त्यानंतरही डिंपल बर्‍याचदा त्याच्यासोबत अनेक सिनेमांत काम केलं.

यानंतर विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितचे किसिंग सीन देखील कँन्ट्रोवर्सीमध्ये होते. त्यावेळी माधुरीला 80-90 च्या दशकाची लेडी अमिताभ बच्चन म्हणायचे. त्यावेळी कोणत्याच अभिनेत्रीला माधुरीइतके फी दिली जात नव्हती. दयावान चित्रपटात विनोद खन्नासोबत एका किसिंग सीनच्या चित्रीकरणासाठी दिग्दर्शक फिरोज खानने माधुरीला 1 कोटी फी दिली. ज्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये. तसा चित्रपट फारसा ताकदीचा नव्हता मात्र माधुरी आणि विनोद यांच्यात चित्रित झालेल्या किसिंग सीनमुळे खळबळ उडाली.

या सीननंतर माधुरीवर बरीच टीका करण्यात आली. त्यानंतर माधुरीने फिरोज खानवर हा सीन हटवण्यासाठी दबाव आणला. नोटीसही पाठविली. मात्र त्याने हा सीन काढण्यास स्पष्ट नकार दिला.

विनोद खन्नासाठी त्याच्या व्यक्तिरेखेत इतका डुबायचा की असं बघून वाटायचं की, हे सगळं सत्यात घडत आहे. त्या सीनमध्येही असंच काहीसे घडलं. माधुरीबरोबर रोमँटिक सीन करताना विनोद इतका त्या सीनमध्ये डुबला की त्याने माधूरीचे ओठ चावले.