Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 21, 2018, 11:05 AM IST
Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड title=
Image: Bollywoodlife.com

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

ऋतिकचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल

अभिनेता ऋतिक रोशन आपल्या आगामी 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमासाठी शूटिंगही सुरु झाली आहे. याच दरम्यान ऋतिक रोशनचे काही फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

पापड विकताना दिसला ऋतिक रोशन

व्हायरल झालेल्या या फोटोजमध्ये ऋतिक रोशन रस्त्यावर पापड विकताना दिसत आहे. ऋतिकचा फोटो पाहता त्याला ओळखणंही थोड कठीण दिसत आहे.

भूमिकेसाठी घेतली प्रचंड मेहनत

'सुपर ३०' या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमारच्या भूमिकेत असणार आहे. आनंद कुमार सारखा लूक करण्यासाठी ऋतिकने खूप मेहनतही घेतली आहे. 

सायकलवर पापड विक्री

फोटोजमध्ये ऋतिक रोशन सायकलवर पापड विकत असल्याचं दिसत आहे. ऋतिकचे हे फोटोज पाहून स्पष्ट दिसत आहे की, तो आनंद कुमारच्या भूमिकेत पूर्णपणे शिरला आहे.

ऋतिकचा लूक पाहून आश्चर्याचा धक्का

या सिनेमाची शूटिंग सुरु होण्यापूर्वी आनंद यांनी ऋतिक रोशनचा लूक पाहिला होता आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं, "विकास बहलने मला काही वेळापूर्वीच ऋतिक रोशनचा लूक दाखवला आणि तो पाहिल्यानंतर मी थक्क झालो".

आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे. या सिनेमासाठी ऋतिक रोशन योग्य कलाकार असल्याचंही आनंद कुमार यांना वाटतं. या सिनेमात ऋतिक रोशनसोबत मृणाल ठाकूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.