Shahrukh-Gauri Fight: शाहरुख खान पत्नी गौरीला झापतानाचा Video व्हायरल, दोघांमध्ये जोरदार भांडण

Shahrukh-Gauri Fight: व्हायरल व्हिडीओत शाहरुख खान (Shahrukh Khan) फोनवर गौरी खानसह (Gauri Khan) स्लीप पॅटर्नवरुन (Sleep Pattern) लढताना दिसत आहे. किंग खानसोबत यावेळी त्याचा मित्र करण जोहरही (Karan Johar) तिथे होता. यावेळी करण जोहर त्यांचं भांडण सोडवण्याऐवजी ते वाढवण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.   

Updated: Feb 10, 2023, 09:05 AM IST
Shahrukh-Gauri Fight: शाहरुख खान पत्नी गौरीला झापतानाचा Video व्हायरल, दोघांमध्ये जोरदार भांडण title=

Shahrukh-Gauri Fight: बॉलिवूड बादशाह शाहरुन खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई (Pathaan Box Office Collection) करत धुमाकूळ घातला आहे. यामुळे सोशल मीडियावर (Social Media) सगळीकडे शाहरुखचीच चर्चा आहे. यादरम्यान शाहरुख खान आणि पत्नी गौरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख खान आणि गौरी (Shahrukh Gauri Fight Video) भांडताना दिसत आहेत. हा जुना व्हिडीओ असून यामध्ये शाहरुख फोनवर गौरीशी बोलताना दिसत आहे. 

शाहरुख गौरीशी का भांडत आहे?

शाहरुख आणि गौरीच्या भांडणाचा व्हिडीओ जुना आहे. या व्हिडीओत शाहरुख खान गौरीशी आपल्या स्लीप पॅटर्नवरुन भांडत आहे. यावेळी तिथे शाहरुखचा मित्र करण जोहरही उपस्थित असतो. पण दोघांचं भांडण सोडवण्याऐवजी तो ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. 

फोनवर गौरीशी बोलताना शाहरुख सांगतो की "यार गौरी, तू ही गोष्ट सोडून दिलीस तर तुझ्या भल्याचं आहे. मला इतकी वर्ष ओळखतेस तरीही माझ्या स्लीप पॅटर्नवर बोलत आहेत. तू रिलॅक्स कर यार. मी 44 वर्षांचा आहे. इतकं तर स्वत: सांभाळू शकतो. करण म्हणतोय की, तुझी सगळी चिंता खोटी आहे. माझी आर्थिक परिस्थिती तुला माहिती आहे, त्यामुळे शॉपिंग कमी करत. करण म्हणतोय शॉपिंग बंद कर".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SRK VIBE (@srkvibe2.0)

व्हिडीओत गौरी खान दिसत नसल्याने शाहरुख झापत असताना तिची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे समजू शकलं नाही. पण शाहरुख आणि गौरीमधील या गोड भांडणाचा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना आवडत आहे. बॉलिवूडमध्ये ऑफ-स्क्रीन जोड्यांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जात त्यात शाहरुख -गौरीचा समावेश आहे. गेल्या 32 वर्षांपासून दोघं एकत्र आहेत. त्यांनी आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. शाहरुख खान कितीही व्यग्र असला तरी आपल्या कुटुंबासाठी नेहमी वेळ काढत असतो. 

पठाणमुळे शाहरुख खान पुन्हा एकदा बादशाह

शाहरुख खानने तब्बल 4 वर्षांनी बॉक्स ऑफिसवर कमबॅक केलं आहे. याआधी त्याचे अनेक मोठे चित्रपट फ्लॉप झाले. यानंतर शाहरुखने काळजीपूर्वक चित्रपट निवडण्याचं ठरवलं होतं. पठाण चित्रपटाला मिळालेलं यश पाहता त्याची निवड योग्य ठरली आहे असं म्हणू शकतो. पठाणने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले असून अद्यापही यशस्वी घोडदौड करत आहे.