मुंबई :
आज आषाढी एकादशी... पंढरपुरात भक्त मंडळींचा पूर लोटलाय... पण हे काय? ज्याच्या दर्शनासाठी भक्तमंडळींना ओढ लागून राहिलीय तो विठ्ठलच 'मिसिंग' झालाय? कुठे हरवलाय 'विठ्ठल'?
असं म्हणत, हरहुन्नरी कलाकार मकरंद सावंत, पराग सावंत, तुषार घाडीगावकर या डिजीटल युगातल्या काही भक्त मंडळींनी हरवलेल्या विठ्ठलाला शोधण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं वायरल होताना दिसतोय.