विरूष्काच्या मुलीची पहिली झलक; पाहा वामिकाचा क्यूट फोटो

अनुष्का कायम वामिकाचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते पण आता...  

Updated: Jun 6, 2021, 08:53 AM IST
विरूष्काच्या मुलीची पहिली झलक; पाहा वामिकाचा क्यूट फोटो

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनससाठी पूर्णपणे तयार आहे. सध्या विराट इंग्लंडमध्ये आहे. त्याच्यासोबत इंग्लंडमध्ये पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील आहे. टीम इंडिया खासगी चार्टर्ड विमानात इंग्लंडला रवाना झाली होती. त्यानंतर  सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दिसत आहे. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी वामिका देखील आहे. वामिका अनुष्काच्या हातात आहे आणि तिने वामिकाचा चेहरा लपवला आहे.

अनुष्का कायम वामिकाचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते पण आता तिचा हा प्रयत्न फेल ठरला. एका कॅमेरामॅनच्या कॅमेऱ्यात वामिकाचा क्यूट चेहरा कैद झाला आहे. या फोटोमध्ये वामिकाचा फोटो स्पष्ट दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये वामिका हुबेहूब वडील विराट कोहलीसराखी दिसत आहे. 

दरम्यान भारतीय संघातील खेळाडूंना साऊथॅम्प्टनच्या मैदानाजवळील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले आहे. यावेळी विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्क साधला. 'मी क्वारंटाईन आहे, मला प्रश्न विचारा?' असं विराटने इन्स्टाग्रामवर लिहिलं. त्यानंतर चाहत्यांनी विराटला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. एका चाहत्याने विराटला खासगी प्रश्न विचारला, 'वामिका नावाचं अर्थ काय? ती कशी आहे? तिची एक झलक पाहाता येईल...' 

विराटच्या या चाहत्यांची इच्छा आता पूर्ण झाली आहे. वामिकाचा एक फोटो समोर आला आहे. या चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना विराट म्हणाला, 'वामिका देवी दुर्गेचं दुसरं नाव आहे. वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची माहिती होत नाही, तोपर्यंत तिचा फोटो शेअर करणार नसल्याचा माझा आणि अनुष्काचा निर्णय आहे.' सध्या वामिकाचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.