विराट-अनुष्काचा मुलगा अकायची पहिली झलक, लंडनमधील 'तो' VIDEO व्हायरल

Anushka Sharma- Virat Kohli Son Akaay : अनुष्का शर्मा- विराट कोहलीचा मुलगा अकायसोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल...

दिक्षा पाटील | Updated: Jul 19, 2024, 10:18 AM IST
विराट-अनुष्काचा मुलगा अकायची पहिली झलक, लंडनमधील 'तो' VIDEO व्हायरल
(Photo Credit : Social Media)

Anushka Sharma- Virat Kohli Son Akaay : क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांची जोडी ही कायम चर्चेत असते. अकायच्या जन्मापासून अनुष्का ही लंडनला आहे. तेव्हापासून सगळ्यांना अकायची एक झलक पाहण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे अनुष्का आणि विराटनं त्यांच्या मुलांसाठी नो-पिक्चर पॉलिसी जारी केली आहे. पण आता विराट आणि अनुष्का त्यांच्या धाकट्या मुलासोबत स्पॉट झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विराट कोहलीच्या एका फॅन पेजनं अनुष्का शर्मासोबत विराट कोहलीची एक झलक शेअर केली आहे. जेव्हा लंडनमध्ये ते दोघं फूलं खरेदी करत होते. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. मात्र, व्हिडीओत ज्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं, ते म्हणजे विराटनं मुलगा अकायला कडेवर घेतल्याचं. अनुष्कानं पांढऱ्या रंगाचं टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केली आहे. विराटनं त्याच्या मुलीला कडेवर घेतल्याचं पाहून सगळ्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या आधी आरसीबीच्या अधिकृत चॅनलवर दानिश सैतसोबत दिलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीला त्याच्या मुलांविषयी विचारण्यात आलं होतं. तेव्हा दानिशनं विराटला विचारं पप्पू कसा आहे. सगळ्यात आधी विराटला कळलं नाही की दानिश नक्की काय बोलतोय, जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली तेव्हा त्याला कळलं की तो अकाय विषयी बोलतोय तर लगेच विराट म्हणाला बाळ मस्त आहे. त्याशिवाय विराटनं सांगितलं की त्याची लेक म्हणजेच वामिकानं जेव्हा पहिल्यांदा बॅट हातात घेतली तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. पण त्याच्या मुलांचं करिअर हे त्यांच्या आवडीवर अवलंबून असेल की त्यांना पुढे काय करायचं आहे. 

हेही वाचा : ...तर देवही 10 वेळा विचार करेल; किरवंताचा उल्लेख करणाऱ्या अशोक सराफ यांचा 'हा' Video पाहाच

20 फेब्रुवारी 2024 रोजी एक पोस्ट शेअर करत त्या दोघांनी घोषणा केली की त्यांना मुलगा झाला आहे. तर त्याचं नाव अकाय आहे. अकाय या नावाचा तुर्कीमध्ये अर्थ पोर्णिमा किंवा चमकणारा चंद्र असा आहे. तर त्याचा हिंदीत अर्थ हा निराकार असा आहे. संस्कृतमध्ये अकायचा अर्थ हा सगळ्यात मोठी शक्ती आहे. अनेकांनी हे देखील म्हटलं की अकाय हे शिवाचं दुसरं नाव आहे. दरम्यान, अनेकांनी विराट आणि अनुष्काचा लेक अकायच्या या व्हिडीओवर नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. 

About the Author