"बेशरम रंग" हे गाणे इन्स्टा रील सारखे, विवेक अग्निहोत्रींचा Shahrukh Khan ला टोमणा, चाहते भडकले

Vivek Agnihotri यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Updated: Dec 14, 2022, 06:50 PM IST
"बेशरम रंग" हे गाणे इन्स्टा रील सारखे, विवेक अग्निहोत्रींचा Shahrukh Khan ला टोमणा, चाहते भडकले  title=

Vivek Agnihotri on Shahrukh Khan New Song : बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीवर पोस्ट शेअर करत ते त्यांच मत मांडताना दिसतात. फक्त आजुबाजूला होणाऱ्या गोष्टींवर नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींवर देखील पोस्ट शेअर करत त्यांचं मत मांडताना दिसतात. विवेक अग्निहोत्री हे पुन्हा एकदा त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी विवेक यांनी बॉलिवूड गाण्यावर निशाणा साधला आहे. 

पाहा काय म्हणाले विवेक अग्निहोत्री -

विवेक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. विवेक यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आधी इन्स्टाग्राम रील्स हे बॉलिवूड गाण्याची कॉपी वाटायचे, तर आजकाल बॉलिवूडची गाणी इन्स्टाग्राम रीलच्या स्वस्त कॉपीसारखे वाटतात. दरम्यान, विवेक यांनी त्यांच्या या ट्वीटनं 'पठाण' (Pathaan) चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याशी संबंध जोडल्याचे म्हटले जात आहे. विवेक अग्निहोत्री यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 

विवेक अग्निहोत्रीच्या ट्विटवर एका नेटकऱ्यानं विवेक अग्निहोत्री यांचं एक जुनं ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये विवेक अग्निहोत्री शाहरुखला सुपरस्टार म्हणाले होते. दुसरा नेटकरी म्हणाला, 'बॉलिवूडमध्ये सगळं बदललं आहे. प्रत्येक गोष्ट कॉपी असल्याचे दिसते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आज काल मला बॉलिवूडची गाणी आवडत नाही.' (Vivek Agnihotri Called The Song Besharam Rang From Pathan A sasti Copy Of Ista Reel Shahrukh khan s Fans got angry) 

हेही वाचा : Car Vastu Shastra: कारमध्ये असं काही ठेवू नका, शनिदेव होतील नाराज

आणखी पुढे विवेक अग्निहोत्री यांना ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, 'एका चित्रपटानं चांगली कमाई काय केली, तू स्वत: ला एसएस राजामौली समजायला लागलास.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'यार ही हेट स्टोरी कोणी बनवली. हा चित्रपट तर सगळ्यांसोबत बसून बघण्यासारखा होता. तिसरा नेटकरी म्हणाला, 'ज्यानं हेट स्टोरी चित्रपटाची निर्मिती केली आणि जिद ची निर्मिती केली, तो अश्लीलतेवर बोलतोय.'