धक्कादायक : प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड होण्यावर 'मिस बारबोडस'चा गंभीर आरोप

लीलानी मैककोनीने नुकताच युट्यूबवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे

Updated: Nov 3, 2022, 08:26 PM IST
धक्कादायक : प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड होण्यावर 'मिस बारबोडस'चा गंभीर आरोप title=

Miss Barbodas On Priyanka Chopra : आज प्रियांकाच्या नावाचा डंका पुर्ण दुनियेत वाजत आहे. 2000 साली हमराज या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केल्यानंतर प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. याचबरोबर ती एक सक्सेस बिझनेस वुमनही आहे. याचबरोबर ती एक ग्लोबल आइकनम्हणून ओळखलं जातं.

सर्वोत्तम अदाकारी सोबत प्रियांका तिच्या सौंदर्यामुळेही ओळखली जाते. कौतुकास्पद म्हणजे सिने सृष्टीत पाऊल ठेवण्याआधी 2000 मध्ये तिने 'मिस वर्ल्ड'चा मुकूटही आपल्या नावे केला होता. मात्र आता मिस बारबोडस असलेली लीलानी (Lielani) ने 2000 च्या 'मिस वर्ल्ड'च्या प्रतियोगिताबद्दल संशय असल्याचं म्हटलं आहे.

मिस बारबोडने शेअर केला व्हिडिओ
2000 मध्ये मिस बारबोडस हा किताब आपल्या नावावर करणारी लीलानी मैककोनीने नुकताच युट्यूबवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात, ती 2022 ची मिस यूएसए प्रतियोगिता विवादावर बोलताना म्हणाली की २००० ची मिस वर्ल्ड प्रतियोगिता विवादमध्येही गडबड होती. आणि प्रियांका चोप्राला खूप फेवर मिळालं होतं.

 ती पुढे म्हणाली की, ती मिस बारबोडस होती आणि जेव्हा तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला तेव्हा विजेती भारतीय होती आणि 1999 मध्ये देखील विजेती भारतीय होती. त्यावेळी फक्त एका भारतीय कंपनीने हा शो स्पॉन्सर केला होता.

प्रियांकाला अधिक पसंती मिळायची
या व्हिडिओमध्ये लीलानीने प्रियांका चोप्राला अधिक पसंती मिळाल्याबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणाली की, प्रियांकाला जिंकवण्यासाठी खूप छान गाऊन बनवला होता. बाकी स्पर्धकांचे फोटो एकत्र छापायचे, पण प्रियांकाचा वेगळा मोठा फोटो वर्तमानपत्रात यायचा.