सगळे गुण जुळूनही कतरिना- विकीमध्ये 'हा' मोठा फरक

मागील दोन वर्षांपासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे.   

Updated: Dec 2, 2021, 05:41 PM IST
सगळे गुण जुळूनही कतरिना- विकीमध्ये 'हा' मोठा फरक
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची लग्नघटिका जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसं त्यांच्या बाबतीत काही रंजक माहिती समोर येऊ लागली आहे. विवाहस्थळापासून पाहुण्यांची यादी, कतरिनाचा लेहंगा या साऱ्याचाच यात समावेश आहे. 

कतरिना आणि विकी त्यांच्या या लग्नाची प्रत्येक माहिती गुलदस्त्यात ठेवू इच्छितानाच काही गोष्टी मात्र त्यांच्या मनाविरुद्ध सर्वांसमोर येतच आहेत. त्यातच आता या जोडीमध्ये फरक आणणारी एक मोठी बाब सर्वांच्या नजरा वळवत आहे. 

कतरिना ही विकीपेक्षा वयानं 5 वर्षांनी मोठी आहे. मागील दोन वर्षांपासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. 

Vicky- Katrina च्या लग्नातील अटींमुळे अभिनेता भडकला; पाहा काय म्हणाला....

फक्त वयाच्याचबाबतीत नव्हे, तर कमाईच्या बाबतीतही कतरिना विकीपेक्षा बरीच पुढे आहे. 

सूत्र आणि काही आकडेवारीच्या आधारे अंदाज लावायचा झाल्यास ती जवळपास 224 कोटी रुपयांची मालकीण आहे. तर, विकी वर्षाला 25 कोटी रुपये कमवतो. 

कतरिनाची कमाई ही विकीच्या 9 पट जास्त आहे. एका चित्रपटासाठी कतरिना 11 कोटी रुपये इतकं मानधन घेते. तर, विकी 3-4 कोटी रुपये इतकं मानधन घेतो. 

फक्त चित्रपटच नव्हे, तर जाहिरातींच्या माध्यमातूनही कतरिना तगडी कमाई करते. इथंही ती विकीपेक्षा तीनपट जास्त कमाई करते. 

बॉलिवूजमधील आघाडीची जोडी, म्हणून सध्या सर्वांच्याच नजरा वळवणाऱ्या कतरिना आणि विकीच्या नात्यामध्ये हा एक मुद्दा फरक आणत आहे. ज्यामुळे आता त्यांचे गुण जुळले, पण ही गोष्ट मात्र जुळलीच नाही हेच आता स्पष्ट होत आहे.