राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीबद्दल असं काय म्हणली मुस्कान जट्टाना? लोक म्हणाले...

बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टी, शिल्पा-राज आणि बरंच काही...

Updated: Aug 16, 2021, 09:20 AM IST
 राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीबद्दल असं काय म्हणली मुस्कान जट्टाना?  लोक म्हणाले...

मुंबई : सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राबद्दल. पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यापासून राजच्या अडचणींमध्ये सतत वाढ होत असताना दिसत आहे. सर्वत स्तरातून वेग-वेगळ्या बातम्या समोर येत आहे. यात महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे तो म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टीचा.  घरात अडणींचा डोंगर असताना शमिता शेट्टी बिग-बॉसच्या घरात दाखल झाली आहे. बिगबॉस म्हटलं की सतत भाडणं आणि वाद. रंगणाऱ्या वादामध्ये बिगबॉसमधील एका कंटेस्टेंटने शिल्पा आणि राजला मध्येघेतलं आहे. 

अभिनेत्री मुस्कान जट्टानाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं नाव घेत शमिता शेट्टीला प्रचंड त्रास दिला आहे. सध्या मुस्कान जट्टानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुस्कान जट्टाना म्हणते, 'मी असं ऐकलं होत की शमिता शेट्टीने बहिणीच्या लग्नासाठी बिगबॉसचं घर सोडलं होतं. आता पुन्हा बहिणीमुळे बिगबॉसमध्ये आली आहे.' असं म्हणतं ती जोर-जोरात हसू लागली. 

यावर लोकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी मुस्कान जट्टानाला उद्धट म्हटलं आहे. सध्या मुस्कान जट्टानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर सध्या सर्वत्र फक्त बिगबॉस शोची चर्चा आहे. शोमध्ये शमिता तुफान खेळी करत असल्याचं देखील चाहत्यांचं म्हणणं आहे.