लग्नात विकीचे ते शब्द ऐकून कतरिनाला अश्रू अनावर

घांनीही सगळ्यांपासून लपवून, तसेच कमी आणि महत्वाच्या लोकांच्या उपस्थीतीत लग्नं केलं. 

Updated: Dec 12, 2021, 12:42 PM IST
लग्नात विकीचे ते शब्द ऐकून कतरिनाला अश्रू अनावर title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. अखेर दोघांनी गुरुवारी राजस्थानमध्ये लग्न केलं. दोघांनीही सगळ्यांपासून लपवून, तसेच कमी आणि महत्वाच्या लोकांच्या उपस्थीतीत लग्नं केलं. त्यांच्या लग्नात पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी नव्हती. तसेच कोणत्याही परिस्थितीत लोकांना सोशल मीडियावरती फोटो अपलोड करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला 2 दिवस उलटले तरी लग्नाचे वेगवेगळे किस्से समोर येत आहेत. आता असे समोर आले आहे की, लग्नात पुष्पहार घालताना विकीने कतरिनासाठी खास वक्तव्य केलं आहे, जे ऐकून कतरिना भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले.

या वक्तव्यात विकीने कतरिना आयुष्यात आल्यानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलले हे विकीने सांगितले होते. बॉलीवूड बबलच्या रिपोर्टनुसार, विराटने कतरिनासाठी भावनिक भाषण केले होते आणि हे पाहून अभिनेत्रीला आपले अश्रू आवरले नाहीत.

विकी कतरिनाला राणीप्रमाणे वागवतो

सूत्रांच्या माहितीनुसार, 'अनेक लोक प्रश्न विचारत आहेत की, विकी आणि कतरिनाने एका वर्षाच्या आत लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला? दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. विकी तर कतरिनाला राणीप्रमाणे वागवतो.

सगळ्यांना हे माहित होतं की, विकी आणि कतरिना लग्न करणार आहेत, पण या वर्षीच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील याचा कोणी विचार केला नव्हाता.

विकी आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये होते, पण हे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. दोघेही एकत्र सुट्टीवर जायचे, एकमेकांच्या घरी वेळ घालवायचे. पण जेव्हा दोघांना नात्याबद्दल प्रश्न विचारला जायचा तेव्हा दोघेही त्याकडे दुर्लक्ष करायचे.

9 डिसेंबरला लग्न झाल्यानंतर विकी आणि कतरिना 10 रोजी लग्नाच्या ठिकाणाहून निघून गेले. पण दोघेही मुंबईला परतले नाही, त्यामुळे ते थेट हनीमूनला गेले असावेत असा अंदाज बांधला जात आहे.

लग्नानंतर विकी आणि कतरिना मालदीवमध्ये हनीमूनसाठी जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिना इंडस्ट्रीतील मित्रांसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन ठेवणार आहेत. मात्र, आता मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणामुळे दोघांचे रिसेप्शन रद्द होऊ शकते किंवा या पार्टीला कमी लोक उपस्थित राहू शकतात, असे बोलले जात आहे.