रणबीर-आलियाच्या लग्ना दरम्यान 'या' सेलिब्रीटी कपलने उरकला रोका समारंभ?

टीव्ही इंडस्ट्रीतील हे कपल लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

Updated: Apr 13, 2022, 08:17 PM IST
  रणबीर-आलियाच्या लग्ना दरम्यान 'या' सेलिब्रीटी कपलने उरकला रोका समारंभ? title=

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडपं तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशला टीव्ही इंडस्ट्रीतलं पॉवर कपल म्हटलं जातं. बिग बॉसच्या घरात करण आणि तेजस्वीच नातं जुळलं आहे. जेव्हा-जेव्हा या दोघांना 1 मिनिटांचाही वेळ मिळतो तेव्हा त्याच पद्धतीने ते एकमेकांना भेटायला जातात. अशा परिस्थितीत आता दोघंही लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

करण कुंद्र- तेजस्वी प्रकाशच्या घराबाहेर त्याच्या पालकांसोबत स्पॉट झाला होता. यादरम्यान करण कुंद्राच्या कपाळावर टिका लागला होता. यावेळी त्याच्या हातात काही पिशव्याही होत्या. अशा स्थितीत दोघंही एका बंधनात बांधले गेले आहेत. त्याचबरोबर, एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करण तेजस्वीसोबत लग्न करणार असल्याचे संकेत देत आहे.  प्रत्यक्षात तो व्हिडिओमध्ये तेजस्वीला पत्नी म्हणून फोन करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, करण म्हणतोय की, 'मी तुला अनेक वेळा इशारा दिला आहे आणि जे हुशार आहेत त्यांना फक्त एक इशारा पुरेसा असतो आणि ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांनी समजून घ्या.' यासोबतच व्हिडिओमध्ये तो तेजस्वीला त्याची बायको म्हणतो.  मात्र तेजस्वीच्या हातात असलेली सोन्याची ही बांगडी करणच्या आईची आहे की अन्य कोणाची हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर, दोघेही त्यांचे नाते पुढे नेत असल्याने चाहते आनंदी आहेत.