जेव्हा तब्बूने केलं छाया कदम यांचं कौतूक; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना, राधिका आप्टे, अनिल धवन, अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका होत्या.

Updated: Jun 7, 2024, 06:23 PM IST
जेव्हा तब्बूने केलं छाया कदम यांचं कौतूक; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा title=

मुंबई : अभिनेता छाया कदम या मराठीसोबतच बॉलिवूडच्याही लोकप्रिय अभिनेत्री आहे. छाया यांनी आत्तापर्यंत अनेक हिंदी मराठी सिनेमाव्दारे आपल्या अभिनय कौशल्याने चित्रपटसृष्टी गाजवली. मात्र या अभिनेत्रीचं बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबच स्पेशल बॉन्डिंग आहे.  तब्बू यांनी २०१८ मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट 'अंधाधून' मध्ये एकत्र काम केलं होतं. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना, राधिका आप्टे, अनिल धवन, अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका होत्या. यामध्ये तब्बूने सिमी सिन्हा ही भूमिका केली होती, तर छाया कदम यांनी सखु कौरचं पात्र साकारले होते. मात्र छाया यांनी तब्बूबद्दल एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

गावी (कोकणात) गेल्यावर तब्बूला फोन आला होता, अशी आठवण छाया कदम यांनी सांगितली. यावेळी तब्बूविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली,''तब्बू आणि माझ्या सेटवर फार काही गप्पा झाल्या नव्हत्या. पण जेव्हा तिने सिनेमा बघितला, फर्स्ट स्क्रीनिंग बघितलं.. मला आठवतं मी कोकणातील गावी होते. आमच्या घरी नेटवर्क नसतं. मी संध्याकाळी गावातील एका मुलाबरोबर 'चल फिरून येऊ' म्हणत बाईकवरून गेले. बाईकवरून जात असताना मधेच फोनला रेंज आली आणि मला एक कॉल आला. मी फोन उचलला तर समोरच्या व्यक्तीने म्हटलं 'हॅलो छायाजी, मैं तब्बू' मी म्हटलं हां. ती म्हणाली 'मैं तब्बू बोल रही हूं' मला वाटलं तब्बू म्हणजे कास्टिंग डायरेक्टर वगैरे कुणीतरी असेल. 

मग मी हां बोलो म्हटलं. मग तिने सांगितलं, 'छायाजी मैं तब्बू बोल रही हूं'. बहोत कमाल काम किया है आपने'. तेव्हा मला लक्षात आलं. मग मी त्या मुलाला म्हटलं थांब थांब जरा गाडी थांबव आणि मग तिच्याशी बोलले. ती म्हणाली, 'बहोत अच्छा काम किया है आपने, मेरे सब दोस्त आपसे मिलना चाहते है.' तिने चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं, त्यासाठी इनव्हाइट केलं होतं. मला हे खूप भारी वाटलं की तिने फोन केला नसता तर काही फरक पडला नसता, पण तिने एवढ्या आवडीने आणि आपुलकीने फोन करून सांगितलं. कलाकारांची यामुळेच ताकद वाढते. असा तब्बूचा किस्सा आहे.