शमा सिकंदरला करावा लागला ''Casting Couch" चा सामना

शमा सिकंदर ही अभिनेत्री तुम्हाला आठवत असेलच. 'यह मेरी लाईफ है' या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली पूजा म्हणजे शमा सिकंदर. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 31, 2017, 08:48 PM IST
शमा सिकंदरला करावा लागला ''Casting Couch" चा सामना title=

मुंबई : शमा सिकंदर ही अभिनेत्री तुम्हाला आठवत असेलच. 'यह मेरी लाईफ है' या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली पूजा म्हणजे शमा सिकंदर. 

ही अभिनेत्री नुकतीच 'सेक्सोहॉलिक' या शॉर्ट फिल्ममध्ये देखील दिसली होती. जिने या शॉर्ट फिल्ममध्ये सेक्स एडिक्टेड महिलेचं कॅरेक्टर प्ले केलं होतं. आता ती लवकरच एका नव्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. शमा बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये आहे. मात्र, अद्याप तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. कारण कोणत्याही दिग्दर्शकासमोर ती आपली तत्व सोडायला तयार नाही. तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं की, तिला एका नामांकित आणि मोठ्या अशा दिग्दर्शकाने कास्टिंग काऊचसाठी अप्रोच केलं होतं. मात्र तिच्या नकारामुळे तीने तो सिनेमा हातातून गमावला. 

सिद्धार्थ काननला दिलेल्या एका मुलाखतीत शमाने हा खळबळजनक खुलासा केला होता. जेव्हा तिला कास्टिंग काउचविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, इंडस्ट्रीत मोठ्या स्तरावर नव्हे परंतु काही प्रमाणात हा प्रकार अजूनही सुरू आहे. ही एक ग्लॅमर लाइन आहे. त्यामुळे येथे असे प्रकार होतच नाही, याविषयीचे मी कधीही समर्थन करणार नाही. त्यातच या क्षेत्रावर मीडियाचे बारीक लक्ष असल्याने असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. 

पुढे बोलताना क्षमाने म्हटले की, ‘मला माझ्या आई-वडिलांनी शिकविले की, जर प्रामाणिकपणे काम मिळाले तरच करायचे. मी माझ्या करिअरमध्ये मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर याविषयीचा सामना केला. कदाचित याच कारणामुळे माझ्याकडे अद्यापपर्यंत एकही मोठा चित्रपट नाही. बारा वर्षांची असताना, मिटिंगला जात असे. तेव्हा मला याचा अर्थ कळत नव्हता. लोक माझ्या मांडीवर हात ठेवायचे तेव्हा मला काही विशेष वाटत नव्हते. मी त्या लोकांच्या वयाचा विचार करून त्यांना अंकल म्हणायचे. परंतु जेव्हा गडबड वाटायचे तेव्हा त्यांना स्माइल देत उठून जायचे,’ असेही शमाने सांगितले.