Hema Malini यांनी लग्नासाठी नकार दिला म्हणून हा अभिनेता राहिला आयुष्यभर एकटा

बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर एकेकाळी बलिवूडमधील अनेक मोठे हिरो फिदा होते.

Updated: May 14, 2021, 08:52 PM IST
 Hema Malini यांनी लग्नासाठी नकार दिला म्हणून हा अभिनेता राहिला आयुष्यभर एकटा

मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर एकेकाळी बलिवूडमधील अनेक मोठे हिरो फिदा होते. असे बरेच स्टार्स होते ज्यांना हेमा यांच्यासोबत सेटल व्हायचं होते. धर्मेंद्र यांच्या व्यतिरिक्त जितेंद्र आणि संजीव कुमार यांचं नाव हेमा यांच्यासोबत जोडलं गेलं होतं

'दुल्हन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र आणि हेमा यांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. असे म्हणतात. शूटिंग संपल्यानंतर जीतेंद्र आपल्या पालकांसह हेमाच्या घरी पोहोचले. दरम्यान, अशी बातमीही मिळाली होती की, जितेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि ते दोघंही लग्न करण्यासाठी चेन्नईमध्ये गेले.

तथापि, त्यावेळी जितेंद्र यांचं आधीच लग्न झालं होतं. पत्नी शोभा कपूरसोबत त्यांचं लग्न झालं होतं. धर्मेंद्र यांनी जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर यांच्याकडे धाव घेतली. हे लग्न थांबवण्यासाठी दोघेही चेन्नईला रवाना झाले. मग काय, हेमाशी लग्न करण्याचं जितेंद्र यांचं स्वप्न अधूरच राहिलं.

हेमा मालिनी यांना जितेंद्रशिवाय संजीव कुमारदेखील पसंत करायचे. संजीव यांची हेमासोबत लग्न करायची इच्छा होती. मात्र, हेमा यांनी त्यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. संजीव आणि हेमा सीता और गीता, धूप छांव सारख्या चित्रपटात एकत्र दिसले.

हेमाच्या यांनी लग्नाला नकार दिल्यानंतर संजीव यांनी कुणाशीच लग्न केलं नाही. असं म्हटलं जातं की, त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित संजीव कुमारयांच्यावर जिवापाड प्रेम करायच्या. पण संजीव कुमार यांनी सुलक्षणा यांना नकार दिला.

सुलक्षणा पंडित यांनीही संजीव यांच्या नकारा नंतर लग्न केलं नाही. अवघ्या 47व्या वर्षी संजीव कुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तर दुसरीकडे, हेमा यांनी धर्मेंद्र यांना आपला जोडीदार म्हणून निवडलं.