लग्न होण्याआधीच किमचं नातं धोक्यात; लिएंडर पेसवर अभिनेत्रीचे गंभीर आरोप 

टेनिसपटू लिएंडर पेस सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

Updated: May 7, 2022, 01:51 PM IST
लग्न होण्याआधीच किमचं नातं धोक्यात; लिएंडर पेसवर अभिनेत्रीचे गंभीर आरोप  title=

मुंबई : टेनिसपटू लिएंडर पेस सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिएंडर काही काळापासून अभिनेत्री किम शर्माला डेट करत आहे आणि आता दोघंही कोर्ट मॅरेज करून सेटल होण्याचा विचार करत आहेत. तसं, लिएंडरने अभिनेत्री महिमा चौधरीलाही डेट केलं आहे. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

ब्रेकअपनंतर महिमाने एका मुलाखतीत लिएंडरबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ती म्हणाली की, लिएंडर हा महान खेळाडू आहे पण तो चांगला माणूस नाही. खरंतर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिमा लिएंडरवर या कारणासाठी नाराज होती की, तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दुसर्‍याला डेट करत होता आणि तो तिची फसवणूक करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिमासोबत रिलेशनशिपमध्ये असूनही लिएंडर संजय दत्तची एक्स पत्नी रिया पिल्लईच्या जवळ आला होता.

याबद्दल महिमा म्हणाली की, जेव्हा मला कळलं की, त्याच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणीतरी आहे. तेव्हा मी थक्क झाले. माझ्यासाठी सगळं काही अवघड होतं पण नंतर मी स्वतःची काळजी घेतली. मी आधीपेक्षा जास्त मॅच्योर झाले आहे. महिमासोबतचं नाते तुटताच लिएंडर रियासोबत अमेरिकेला गेला आणि लिव्ह इनमध्ये राहू लागला.

दोघांनाही एक मुलगी होती पण रियाने लिएंडरवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. बोरा महिमाने बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. ती एका मुलीची आई आहे. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला.