राखीकडून Boyfriend आदिलचा पर्दाफाश म्हणाली, 'तो मला रोज चावतो आणि मग...'

राखी सावंत सध्या तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे.

Updated: Dec 20, 2022, 07:53 PM IST
राखीकडून Boyfriend आदिलचा पर्दाफाश म्हणाली, 'तो मला रोज चावतो आणि मग...' title=

मुंबई : राखी सावंत सध्या तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे. आदिल राखीपेक्षा 6 वर्षांनी लहान असून दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी अनेकदा वेकशनलाही जाताना दिसतात. यादरम्यान राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

राखी सावंत हे नाव कायम चर्चेत असतं. कधी वादामुळे राखी चर्चेत असते. तर कधी ती पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट होते. एवढच नव्हे तर ती नेहमीच बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी (Adil Durrani)बद्दल व्यक्त होत असते. या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळते. मात्र एकदा राखीने आदिलबाबत असंकाही वक्तव्य केलं होतं की, ते ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच हैराण झाले होते.

एकत्र स्पॉट झाले
एकदा आदिल आणि राखी एकत्र स्पॉट झाले होते. तेव्हा राखी असं काही बोलून गेली ज्यामुळे ऐकणारे थक्क झाले. राखीने तिच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीबद्दल सांगितलं की, 'हा माझा भाऊ आहे.' तर आदिलवर निशाणा साधात ती म्हणाली की, 'आदिल माझा खाटिक आहे. आणि म्हणून तो मला रोज कापतो चावतो.' राखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आदिलने दिलं प्रत्युत्तर
राखीचं हे बोलणं ऐकून आदिलही मस्करीत म्हणतो की, हा ही आमचं दोघांचं मटण विकणारेय. यावर ती पुन्हा म्हणते की, मी त्याची प्रेयसी आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये लोकं फनी कमेंट्स करत आहेत. त्याच्या या व्हिडिओवर चाहते लाईक्स करुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतं. 

सध्या राखी बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली आहे. हिंदी प्रमाणेच राखी मराठीमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. राखी प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करताना दिसत आहे. यावेळीच राखीने एक ईच्छा बोलून दाखवली होती की, तिला हिंदी बिग बॉसमध्ये बॉयफ्रेंड आदिलसोबत एंट्री घ्यायची आहे. 

कशी सुरु झाली आदिल आणि राखीची लव्हस्टोरी
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राखी सावंतने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की, ही व्यक्ती देवाने माझ्यासाठी पाठवली आहे. रितेशसोबत लग्न तुटल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेली होती.  तेव्हाच आदिल माझ्या आयुष्यात आला. त्याने महिनाभरातच मला प्रपोज केलं. खरं सांगायचं झालं तर मी यासाठी अजिबात तयार नव्हते. पण तो म्हणाला की तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मग मी पण त्याच्या प्रेमात पडले.