आलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!

Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.

Updated: Dec 20, 2022, 07:29 PM IST
आलिया गेली Messi ची मॅच पहायला...  बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!! title=
alia bhatt Fifa World Cup 2022

Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत. तेव्हा त्या दोघांची एकच चर्चा आहे. त्या दोघांनी अर्जेटिनाच्या विजयासाठी चिअर-अप करताना दिसले. त्यांनी अर्जेंटिनाचा (Argentina) जर्सी घातला होता. अशावेळी सगळ्यांच्या नजरा या आलिया भट्टवर खिळल्या होत्या. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यावेळी एकत्र स्पॉट झाले. परंतु आलियाचं बदललं रूप पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. सध्या तिचे फोटोज व्हायरल होत आहेत. (alia bhatt and ranbir kapoor spotted in mumbai wearing jersy after fifa world cup 2022 argentina win)

या रविवारी कतारमध्ये फिका विश्वचषक स्पर्धेचा अंतिम टप्पा पार पडल. फ्रान्स व लिओनेल मेस्सीच्या (Messi) संघांनी एकमेकांशी चांगली झुंज दिली. त्यात मेस्सीच्या संघांचा मोठा विजय झाला. ही मॅच जिंकल्यापासून सगळीकडेच मेस्सीच्या नावाचा जयघोष सुरू आहे. सोशल मीडियावरून तर रस्त्यावरसुद्धा फूटबॉलच्या चाहत्यांनी मेस्सीला शुभेच्छा दिल्या. अगदी बॉलिवूड सेलिब्रेटीही त्यात मागे नव्हते आणि या सगळ्यात सर्वात जास्त आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं चाहत्यांचे लक्ष वेधले. 

 आलिया आणि रणबीरही मेस्सीच्या सपोर्टमध्ये बाहेर पडले होते. परंतु चाहत्यांची नजर यावेळी आलियावरच होती. आई झाल्यानंतर आलिया फारच जाड झाली आहे. म्हणून तिला ट्रोल करण्यात आलं. त्यातून अनेकांनी आई झाल्यानंतरही आलिया खूप ग्लॅमरस दिसत असल्याची उपमाही दिली. आलिया आई झाल्यानंतर आपल्या शरीरावर काम करते आहे. ती योग्य डाएट आणि योगा (yOGA) फोलो करते आहे. यावेळी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर फिल्ममेकर लव रंजन यांच्या घराबाहेर स्पॉट झाले. 

आलियाची फॅशन 

आलिया अनेकदा स्वत:ला कमर्फेटेबल असे कपडे निवडते त्यामुळे ती कुठल्या लुकमध्ये चांगलीच दिसते. आई झाल्यानंतरही आलिया आपल्या कपड्यांची चॉईसही साधी सिंपल ठेवली आहे. आलियानं प्रेग्नंन्सीच्या (Alia Bhatt Pregnancy) वेळी फ्रॉक आणि गाऊन सारखे कपडे निवडले होते. यावेळी आलिया आणि रणबीरनं मॅचिंग असे कपडे घातले होते. दोघांनीही  मेस्सी टीम टी-शर्ट घातला होता आणि दोघांनी जीन्स घातली होती. आलियानं गी पॅटर्न असलेल्या मॉम जीन्ससह व्ही-नेक टी-शर्ट घातला होता. तिनं टी-शर्ट लूज-फिट लूक ठेवला होता. ज्यामध्ये हाफ स्लीव्हज होते. तिने तिचा लूक गोल्डन हूप्सने पूर्ण केला आणि केस मोकळे सोडले होते. न्यूड हील्स तिनं यावेळी परिधान केल्या होत्या. तर रणबीरनं अर्जेंटिनाच्या जर्सीसोबत फुल स्लीव्हजसह गोल नेकलाइन लुक दिला होता आणि डार्क ब्लू डेनिम जीन्स घातली होती आणि वर कॅप घातली होती.