सैफ-करीनाच्या अफेअरची माहिती मिळताच Rani Mukerji ने अभिनेत्याला दिला होता 'हा' सल्ला

सैफ अली खान आणि करीना कपूरची गणना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये केली जाते.  

Updated: Oct 12, 2022, 11:46 PM IST
सैफ-करीनाच्या अफेअरची माहिती मिळताच Rani Mukerji ने अभिनेत्याला दिला होता 'हा' सल्ला  title=

मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूरची गणना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये केली जाते. आज आम्ही तुम्हाला सैफ-करिनाच्या आयुष्याशी निगडीत एक रंजक किस्सा सांगणार आहोत. खरं
तर करिनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफने 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं.

हे लग्न 13 वर्षे टिकलं आणि 2004 मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. पहिल्या लग्नापासून सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर ज्यांची कस्टडी अमृता सिंगकडे होती.

त्याचवेळी घटस्फोटानंतर काही वर्षांनी 2008 मध्ये आलेल्या 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफची करीना कपूरसोबतची जवळीक वाढू लागली. या चित्रपटात सैफ अली खान, अक्षय कुमार तसंच करीना कपूर आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते आणि काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सैफने 2012 मध्ये करिनासोबत दुसरं लग्न केलं.
 
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, लग्नाआधी जेव्हा सैफ आणि करीना रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा अभिनेत्री राणी मुखर्जीने सैफ अली खानला एक सल्ला दिला होता. राणीने सैफला सल्ला दिला होता की करीनाला तुम्ही एखाद्या मुलासारखं  ट्रीट करावं.

सैफने करीनाला कमी लेखू नये आणि समान दर्जा देऊ नये, असा राणीचा हेतू होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणीनेही करीनाला सांगितलं होतं की, तिने सैफला असा सल्ला दिला आहे. करीना आणि सैफ हे तैमूर आणि जहांगीर या दोन मुलांचे पालक आहेत.