कित्येक वर्षानंतर आपल्या प्रेमाची गळाभेट घेताना रेखा भावूक!

तुम्हाला वाटतं असेल की आम्ही बीग बी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलतोय तर तुम्ही चूक आहात...  

Updated: May 18, 2018, 11:08 PM IST
कित्येक वर्षानंतर आपल्या प्रेमाची गळाभेट घेताना रेखा भावूक! title=

मुंबई : मुंबईमध्ये नुकतंच 'सोसायटी अचिव्हर्स अवॉर्डस्'चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाही झाली होती. या कार्यक्रमात रेखा यांनी आपल्या जुन्या प्रेमाला पाहिलं आणि काही काळ त्या भावूक झाल्या... तुम्हाला वाटतं असेल की आम्ही बीग बी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलतोय तर तुम्ही चूक आहात... आम्ही बोलतोय ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्याबद्दल... 

बीग बी यांच्यानंतर रेखा जर कुणासोबत काम करताना चर्चेचा विषय ठरल्यात तर ते आहेत जितेंद्र यांच्यासोबत... एकेकाळी रेखा यांचा प्रियकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितेंद्र यांची या कार्यक्रमात रेखा यांच्याशी नजरानजर झाली... आणि दोघंही एकमेकांच्या पुन्हा प्रेमात पडले... दोघं एकमेकांच्या समोरासमोर येताच त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली... आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळाही दिला. 


रेखा आणि जितेंद्र 

या कार्यक्रमात रेखा गडद रानी कलरच्या सोनेरी बॉर्डर असलेल्या साडीत या वयातही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या... त्यांच्या हातात गोल्डन रंगाची पर्स आणि केसांत गजरा शोभून दिसत होता. 

या कार्यक्रमात जितेंद्र यांच्यासोबतच त्यांचा मुलगा जितेंद्र आणि एकता कपूर हेदेखील उपस्थित होते... तसंच हेमामालिनी, सोनू सूद, मुग्धा गोडसे, सुचित्रा कृष्णमूर्ती, झीनत अमान, गुलशन कुमार,  दिव्या खोसला तसंच रवीना टंडन यांसारखे अनेक जण उपस्थित होते.