मुंबई : आजकाल ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. मग त्याचा सामना करण्यासाठी अनेकजण धुम्रपान, मद्यपान, ड्रग्स अशा अनेक व्यसनांच्या आहारी जातात. व्यसनाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कलाकार अनुराग कश्यपही स्मोकिंग म्हणजेच धुम्रपानाच्या विळख्यात अडकला होता. मात्र जिद्दीने त्याने यावर मात केली आहे. अनुराग कश्यपने नुकतीच इंस्टाग्रामवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये धुम्रपानाच्या विळख्यात अडकलेला अनुराग कसा बाहेर पडला? सध्या त्याचं आयुष्य कसं आहे? याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या 40 दिवसात सिगारेटला हात लावलं नसल्याचं अनुरागने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहले आहे. सोबतच धुम्रपानाची सवय सोडल्यानंतर आता आयुष्यात खूपच सकारात्मक बदल झाल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
अनुरागने लिहलेल्या पोस्टनुसार आता तो 300 मीटर स्विमिंग पूलमध्ये 93 मिनिटं स्विमिंग करतो. त्याची भूकही आता सुधारल्याचं त्याने लिहलं आहे. शारीरिक स्टॅमिनासोबतच आता खोकल्याचा त्रास, सकाळी उठल्यावर डोकं जड होणं असा त्रास होत नाही.
अनुराग कश्यप गेली 25 वर्ष चेन स्मोकर असल्याचंही त्याने सांगितले आहे. मात्र आता धुम्रपानातून पूर्णपणे बाहेर पडल्याची माहिती त्याने दिली आहे.