करीनाच्या कपड्यांवर भडकला सैफ अली खान

करीना कपूर खान आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते.. पण तिचा हाच बोल्ड अंदाज सैफ अली खानला खटकलेला दिसतोयं.

Updated: Jun 4, 2018, 07:34 PM IST
करीनाच्या कपड्यांवर भडकला सैफ अली खान title=

मुंबई : करीना कपूर खान आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते.. पण तिचा हाच बोल्ड अंदाज सैफ अली खानला खटकलेला दिसतोयं. बोल्ड अँड ब्युटिफूल बेबो नेहमीच बिनधास्त असते. पुन्हा जिम जॉईन करुन पहिल्या पेक्षा जास्त बोल्ड दिसण्यासाठी बेबो चर्चेत असते. 

आपल्या कमबॅक चित्रपट 'वीरे दी वेडिंग'साठी बेबोने खूप मेहनत घेतलीये... आणि प्रमोशन्समध्येही चारही हिरोइन्समधून करीनाचीचं जास्त क्रेझ दिसतेय. ही yummy mommy आपल्या फॅशनने अनेकांना टशन देतं असते... मात्र एका प्रमोशनल इव्हेंटसाठी तिनं घातलेला हा डार्क निळ्या रंगातला रिव्हेलिंग ड्रेस सैफला काही आवडला नाही असंच दिसतयं.. इतकंच नव्हे तर तिने हा ड्रेस बदलावा असा सैफने तिला सल्लाही दिला. याचा खुलासा खुद्द करीनाने केलाय. 

वीरे दी वेडिंगच्या म्युझिक लाँच दरम्यान करीना बोल्ड लूकमध्ये दिसली. मात्र करीनाचा हा बोल्ड अंदाज सैफला काही पसंत आला नाही. करीनाने या किश्श्याबद्दल सांगताना म्हटले, सैफने जेव्हा मला या कपड्यांमध्ये पाहिले तेव्हा म्हटले तु हे काय घातलेस. तेव्हा मी म्हणाले, हा तर खूप सुंदर आहे. प्रत्येकाने माझी स्तुती केली. तेव्हा सैफ म्हणाला, तु दुसरे कपडे घालायला हवे होतेस. जाऊन कपडे बदल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x