सलमान सिद्धार्थच्या मृत्यूबाबत हे काय म्हणाला, पाहून तुम्हीही....

अभिनेता सलमान खानचा सिद्धार्थ शुक्ला हा सर्वात आवडता स्पर्धक होता.

Updated: Sep 3, 2021, 04:46 PM IST
सलमान सिद्धार्थच्या मृत्यूबाबत हे काय म्हणाला, पाहून तुम्हीही.... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. जेव्हा सलमान खान बिग बॉस 13 होस्ट करत होता. त्या काळात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा त्याचा सर्वात आवडता स्पर्धक होता. सलमान खानने अनेकवेळा टीव्हीवर सर्वांसमोर सांगितलं होतं की, सिद्धार्थ शुक्ला हा या शोचा जिव आहे.

 ज्यामुळे हा शो आज प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. नुकतचं वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सलमान खाननेही यानंतर ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. अशा परिस्थितीत आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे सिद्धार्थ शुक्ला हॉस्पिटलमध्ये आहे आणि सलमान खान त्याची थट्टा करत आहे.

सिद्धार्थ शुक्ला आणि सलमान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. सिद्धार्थ नेहमी सलमान खानला सर म्हणत होता. पण या व्हिडिओमध्ये सलमान खान सिद्धार्थ शुक्लाला हॉस्पिटलमध्ये पाहून खूप मस्करी करताना दिसत आहे. सलमान खान या व्हिडिओमध्ये म्हणतोय की, "चाहत्यांनी तुम्हाला या गेममध्ये वाचवलं आहे मात्र वरचा तुला वाचवणार नाही. प्रत्येकजण रडेल… प्रत्येकजण म्हणेल की, तुम्ही काहीही म्हणा, माणूस चांगला होता, ओरडायचा, रागवायचा,  धक्का मारायचा, मात्र कुठेतरी नक्कीच दुःख आहे. काहींनी बिग बॉसमध्ये लग्न केलं, काही बिग बॉसमध्ये येवून प्रेमात पडले, काही बिग बॉसच्या आत आले काही बाहेर पडले. " ज्यावेळी सलमान खान हे सगळं सांगत होता, त्यावेळी सिद्धार्थ शुक्ला देखील सलमान खानचे हे शब्द खूप एन्जॉय करत होता आणि हसत होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी या व्हिडिओला भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जिथे एका युजरने लिहिलं आहे की "कोणीही कोणालाही चुकीचं बोलू नये, जर सरस्वती जीभेवर बसली तर ती गोष्ट खरी ठरते.. तर  दुसर्‍या युजरने लिहिलं की, "मी हा व्हिडिओ कधीच पाहिला नाही,आपण मृत्यूबद्दल किती सहजपणे विनोद करतो.

सिद्धार्थच्या पार्थिवावर आज मुंबईतील ब्रह्माकुमारी केंद्रामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. जिथे टीव्हीशी संबंधित अनेक स्टार्स आणि सिद्धार्थचे सगळे मित्र काल रात्री उशिरापर्यंत आणि आज सकाळी त्याच्या घरी पोहोचले होते. प्रत्येकजण त्याची आई आणि त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाजला भेटत होते.