मुंबई : आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. २०१२ मध्ये प्लेबॉय मासिकासाठी न्यूड पोज देणारी शर्लिन पहिली भारतीय आहे. शर्लिनने टाइमपास आणि रेड स्वस्तिकसह काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ती तिच्या कामापेक्षा तिच्या बोल्ड स्टाइल आणि बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.
शर्लिन चोप्रा देखील बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या सीझन 3मध्ये दिसली आहे. शोची ऑफर मिळाल्यावर, अभिनेत्रीने बिग बॉसच्या घराच्या बाथरूममध्ये कॅमेरा बसवण्याचा आग्रह धरला होता कारण तिला कॅमेरासमोर आंघोळ करायची होती. अभिनेत्रीची ही मागणी निर्मात्यांनी मान्य केली नसली तरी काही दिवसांतच ती घराबाहेर पडली होती.
हैद्राबादमध्ये जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली शर्लिन सांगते की, वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत ती खूप अधीन होती. ती पुस्तकांमध्ये हरवून जायची आणि चष्मा घालायची. तसंच, तिला पार्ट्या आणि पिकनिकची आवड नव्हती. शर्लिन म्हणाली होती की, नंतर तिने स्वतःला बदललं आणि ती ग्लॅमरस झाली.
पैशासाठी शारिरीक संबध
आपल्या वादग्रस्त आणि बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या शर्लिनने पैशांसाठी लोकांसोबत शारिरीक संबध ठेवल्याचं ट्विट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याबद्दल बोलताना तिने नंतर सांगितलं की, 'माझ्या मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी माझ्यापेक्षा खूप मोठ्या पुरुषांशी डेटिंग करू लागले जे मला महागड्या भेटवस्तू देऊन खूश करायचे. नंतर मला समजलं की माझ्या नात्यात प्रेम, आदर आणि काळजी नाही.
विद्या बालनसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती
शर्लिनने अभिनेत्री विद्या बालनसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की तिला कोणत्या अभिनेत्यासोबत लव्ह मेकिंग सीन करायला आवडेल. यावर ती विद्या बालनचं नाव घेत म्हणाली, 'मला विद्या बालनसोबत एक पॅशिनेट सीन द्यायला आवडेल. मला ती खूप आवडते. जर ती मला ऐकत असेल तर मी तिला सांगू इच्छिते की, विद्या मी सिद्धार्थ (विद्याचा नवरा) पेक्षा तुझी चांगली काळजी घेऊ शकते.'
शर्लिनने ती बायसेक्शुअल असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती आहे. लग्नाबाबत ती म्हणाली होती की, ज्या दिवशी तिला कोणीतरी सापडेल जो तिला समजून घेईल आणि तिला ती आहे तशी स्वीकारेल, तेव्हाच ती त्याच्याशी लग्न करेल.