मुंबई : मँचेस्टर येथे पार पडलेल्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील उपांत्य सामन्याच भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडच्या संघाकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला. त्यनंतर कलाकारांनी खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आतापर्यंतच्या खेळाबद्दल त्यांची प्रशंसा केली. चक्क गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत 'धोनी, तू रिटायर्ड होऊ नकोस, प्लीज असे करू नकोस. देशाला तुझी गजर आहे' असे म्हणाल्या आहेत. सध्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत.
Namaskar M S Dhoni ji.Aaj kal main sun rahi hun ke Aap retire hona chahte hain.Kripaya aap aisa mat sochiye.Desh ko aap ke khel ki zaroorat hai aur ye meri bhi request hai ki Retirement ka vichar bhi aap mann mein mat laayiye.@msdhoni
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) July 11, 2019
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेत उतरलेल्या भारतीय संघाचा हा पराभव खरंतर अनेकांनाच निराश करुन गेला. पण, या पराभवाकडे सकारात्मक दृष्टीने पाहात सर्वांनीच या स्पर्धेतील संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीची प्रशंसा केली. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत.
हरलो तर काय झालं... असं म्हणत कलाकारांनी संघातील खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आतापर्यंतच्या खेळाबद्दल त्यांची प्रशंसा केली. शिवाय त्यांचे आभारही मानले. भारतीय संघाने या सामन्यात विजयी छाप पाडावी अशीच क्रीडा रसिकांची अपेक्षा होती. पण, ही गणितं चुकली आणि सर्व गडी बाद होत विराटसेना १८ धावांनी किवींच्या संघाकडून पराभूत झाली.