लंडन : चित्रपटांमध्ये आपण हे पाहतोच ही एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गोळीने किंवा अन्य साधनांचा वापर करुन मारतो. परंतु हे सगळं सिनेमा पूरतंच मर्यादित असतं हे आपल्याला माहित असतं, हे सगळं बनावटी असतं. पण अलीकडेच एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला धक्काबसेल. एका चित्रपटाच्या सेटवर एक अपघात घडला ज्यामध्ये अभिनेताने चुकून सेटवर गोळी चालवली आणि ज्यामुळे सिनेमॅटोग्राफरचा जागीच मृत्यू झाला.
होय! ही बातमी खरी आहे. आंतरराष्ट्रीय स्टार ऍलेक बाल्डविनने शूटिंगदरम्यान आपल्याच क्रू मेंबरचा जीव घेतला आहे. एवढेच नाही तर या अपघातात या चित्रपटाचा दिग्दर्शकही जखमी झाला आहे.
अभिनेता ऍलेक बाल्डविनने (alec baldwin) त्याच्या आगामी 'रस्ट' चित्रपटाच्या शूटींगदरम्यान चुकून गोळी झाडली आहे. विशेष म्हणजे हा अपघात चित्रपटात वापरण्यात आलेल्या बंदुकीमुळे झाला आहे. या चित्रपटाच्या सेटचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'रस्ट' चित्रपटाचे शूटींग न्यू मेक्सिकोतील सांता फे येथील बोनान्झा क्रीक रँच येथे सुरू होते. मात्र गुरुवारी सेटवरच ही घटना घडली. या घटनेत चित्रपटाची सिनेमॅटोग्राफर हॅलिना हचिन्सचा मृत्यू झाला. हॅचिन्स 42 वर्षांची होती. यासोबतच या घटनेत चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक 48 वर्षीय जोएल सूजा हे देखील जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले, परंतु अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. प्रॉप गनमध्ये गोळ्या का भरल्या होत्या हे समजू शकले नाही. सध्या बाल्डविन, सौझा आणि 'रस्ट' चित्रपटाशी संबंधित निर्मात्यांचे प्रतिनिधी या प्रकरणी मौन बाळगून आहेत.