विराट -अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना काजोलने केली 'ही' तक्रार

इंडियन क्रिकेट टीमचा  तडफदार कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी इटलीत विवाहबंधानात अडकले. मिडीया आणि चाहत्यांपासून दूर सिक्रेट पद्धतीमध्ये या दोघांनीही लग्न  केले. 

Updated: Dec 12, 2017, 04:54 PM IST
विराट -अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना काजोलने केली 'ही' तक्रार  title=

दिल्ली : इंडियन क्रिकेट टीमचा  तडफदार कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी इटलीत विवाहबंधानात अडकले. मिडीया आणि चाहत्यांपासून दूर सिक्रेट पद्धतीमध्ये या दोघांनीही लग्न  केले. 

विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाचा फोटो आणि अधिकृत घोषणा ऐकल्यानंतर त्यांनी सार्‍यांनीच या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.  

क्रिकेटर आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना अनेकजणांनी 'विरूष्का' या हटके नावाचा वापर केला. ट्विटरवरही हा हॅशटग ट्रेंड होत होता. मात्र काजोलला मात्र हे पटले नाही.  

काजोलचं ट्विट काय ? 

विराट आणि अनुष्काला काजोलने शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र इतरांच्या शुभेच्छा बघून मात्र तिने एक तक्रारदेखील केली. ' विरूष्कापेक्षा  मला तुमच्या दोघांचे नाव अधिक आवडते.' 

 

 

इटलीमध्ये विवाहबद्ध  

अनुष्का आणि विराट हे दोघेही अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. 21  डिसेंबर रोजी दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीमध्ये होणार आहे. या सोहळ्यात सेलिब्रिटी आणि क्रिकेटर हजर राहणार आहेत.