कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या ६० लोकांचे रिपोर्ट आले समोर

गायक कनिका कपूरची  तिसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.  

Updated: Mar 25, 2020, 04:00 PM IST
कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या ६० लोकांचे रिपोर्ट आले समोर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कनिका कपूर कोरोना ग्रस्त असल्याची बातमी समोर आली आहे. आज तिच्यावर कोरोनाची तीसरी चाचणी करण्यात आली आहे. तिची तिसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे तिच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह सिद्ध झाली आहे.  कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या २६२ लोकांपैकी ६० लोकांचे मेडिकल रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे काही अंशी ही बातमी दिलासा देणारी आहे. कनिका ९ मार्च रोजी लंडनवरून भारतात परतली होती. त्यानंतर लखनऊमध्ये ती अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती.

या बड्या पार्ट्यामध्ये अनेक दिग्गज व्यक्ती देखील उपस्थित होते. त्यामध्ये आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह, माजी मुख्यमंत्री  वसंधुरा राजे, त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह हे देखील उपस्थित होते.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील राजकीय मंडळी आणि उपस्थित असलेल्या अन्य लोकांचे  रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत. शिवाय कनिकावर कोरोना प्रकरणी माहिती लपवल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहीती लपल्याचा आरोप तिच्यावर होतोय. उत्तर प्रदेश सरकारने ती उपस्थित असलेल्या सर्व पार्ट्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘बेबी डॉल’, ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली कनिका शुक्रवारी भारतात परतली. त्यानंतर तिला जवळपास पाच दिवस ताप होता. हे सर्व कोरोनाचे लक्षणं असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने स्वत:ची कोरोना चाचणी केली आणि तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले.

 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी महाराष्ट्रातून अनेक दिलासादायक बातम्या समोर येत आहेत. काही कोरोना रुग्ण सुखरूप बरे होवून त्यांच्या घरी दोखील गेले आहेत. पुण्यातील पहिल्या दोन रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. दोंघाचे १४ दिवसानंतर सलग दोनदा घेतलेले सँपल निगेटिव्ह आले आहेत. या दाम्पत्याला ९ मार्च रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं.