सोशल मीडियावर व्हायरल होतेय छोटी कंगना, पहा कंगनाची छोटी कार्बन कॉपी

बॉलिवूडची यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौतचे जगभरात चाहते आहेत.

Updated: Jul 9, 2021, 11:01 PM IST
 सोशल मीडियावर व्हायरल होतेय छोटी कंगना, पहा कंगनाची छोटी कार्बन कॉपी

मुंबई : बॉलिवूडची यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौतचे जगभरात चाहते आहेत. यात सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. यात एका छोट्या परीचा पण समावेश आहे. ही लहान मुलगी नऊ वर्षांची असून, इंस्टाग्रामवर ही चिमुकली कंगना या नावाने व्हायरल होत आहे. या नऊ वर्षाच्या मुलीने चक्क कंगनाचं देखील लक्ष वेधलं आहे. या चिमुकलीला कंगनाचा एक अतिशय गोंडस मॅसेजही मिळाला आहे. सनम पुरी नावाची ही मुलगी 'छोटी कंगना' या नावाने प्रसिद्ध आहे. सनमचे केवळ केस कंगनासारखे नसून ही चिमुकली कंगना सगळ्याच प्रकारे कॉपी करते  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिकापासून ते कंगनाचा नवा चित्रपट धाकडपर्यंत सनमने आत्तापर्यंतचे कंगनाचे जवळजवळ सगळेच लूक कॉपी केले आहेत. सनम तिचे डायलॉग ज्या तीव्रतेने आणि फ्लेयरने बोलते जशी कंगना बोलते. एवढचं नव्हे तर, सनम तिच्या सारखे कपडेही घालते आणि कंगनासारख्या पोझेस देण्याचाचा प्रयत्न करते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर सनमची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने या चिमुकलीला विचारलं, "अरे बाळा, तू अभ्यास करतेस की, दिवसभर हेच करतेस? यांवर मुलीने उत्तर दिलं की, ती एक 'क्लास टॉपर' आहे. कंगना आणि 'छोटी कंगना' अमृतसरमध्ये पहिल्यांदा भेटल्या.

कंगनाचे आगामी चित्रपट
कंगना सध्या 'धाकड' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ती सेटवरचे फोटो कायम शेअर करत असते. हा सिनेमा एक अ‍ॅक्शन सिनेमा आहे ज्यामध्ये कंगना लारा क्रॉफ्ट-एस्केची भूमिका साकारणार आहे. याशिवाय तिच्याकडे थलावीसह अनेक चित्रपट आहेत. हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता, मात्र कोरोना व्हायरसमुळे हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. यासंह ती तेजस, इमरजंन्सी आणि टीकू वेड्स शेरू सारख्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.