घटस्फोटानंतर लाल सिंग चढ्ढा सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण राव एकत्र, पहा फोटो

बॉलीवुड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी 3 जुलै रोजी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Jul 9, 2021, 10:46 PM IST
 घटस्फोटानंतर लाल सिंग चढ्ढा सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण राव एकत्र, पहा फोटो title=

मुंबई : बॉलीवुड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच 3 जुलै रोजी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी ऑफिशिअल स्टेटमेंट देऊन घटस्फोट जाहीर केला. त्याचवेळी घटस्फोटाच्या घोषणेनंतर आठवडाभरानंतर सोशल मीडियावर आलेल्या या दोघांचेही फोटो पाहून असंच दिसतं आहे की, जणू या दोघांमध्ये काहीही झालं नाहीये. या फोटोंत दोघंही एकत्र आनंदी दिसत आहेत. आमिर खान आणि किरण राव या दोघांच्याही चेहऱ्यावर छान स्माईल दिसत आहे.

हा फोटो आमिर खान आणि करीना कपूरच्या आगामी चित्रपटाच्या लालसिंग चड्ढाच्या सेटवरचा आहे. जो साऊथ स्टार नागा चैतन्यने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत नागा चैतन्यही दिसत आहे. तो देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या फोटोत आमिर आणि नागा दोघेही सैन्याच्या वेशात दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आमिर आणि किरणचा होता प्रेम विवाह 
आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. आमिर जेव्हा किरणला भेटला तेव्हा देखील तो रीनाबरोबर होता. आमिरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, रीनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे आणि किरणचे अफेअर सुरु झाले.आमिर त्याच्या आयुष्यातील कठीण दिवसातून जात होता. तेव्हा एक दिवस त्याला किरणचा फोन आला आणि दोघांनी सुमारे 30 मिनिटे फोनवर चर्चा केली. 

किरणच्या त्या 30 मिनिटांच्या कॉलनंतर आमिरला खूप छान वाटत होते. त्यानंतर आमिरने उर्वरित आयुष्य किरणबरोबर घालवण्याचा निर्णय घेतला.आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 रोजी एकमेकांशी लग्न केले होते. यानंतर त्यांचा मुलगा आझादचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून 2011 मध्ये झाला होता. आता घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकत्र आपल्या मुलाचे संगोपन करणार आहेत.