आलिया-रणबीरमध्ये कोण आहे श्रीमंत? जाणून घ्या दोघांची संपत्ती

सध्या बी-टाऊनमधील काही कपल्स त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहेत.

Updated: Dec 6, 2021, 09:06 PM IST
आलिया-रणबीरमध्ये कोण आहे श्रीमंत? जाणून घ्या दोघांची संपत्ती

मुंबई : सध्या बी-टाऊनमधील काही कपल्स त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहेत. त्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी देखील आहे. जिथे एकीकडे अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्रलेखा यांच्या लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा आहेत. तसंच, चाहते रणबीर आलियाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्‍या संपत्तीबद्दल सांगणार आहोत.

आलिया भट्टची संपत्ती
महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टबद्दल सांगायचं झालं तर एका रिपोर्टनुसार आलिया भट्टची 2021 पर्यंत एकूण 162 कोटींची संपत्ती आहे. आलिया एका महिन्यात 60 लाखांहून अधिक कमावते. आलिया एका चित्रपटासाठी 2-5 कोटी रुपये घेते. आलिया भट्टकडे रेंज रोव्हर, ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, जॅग्वार यांसारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

खानदानी श्रीमंत आहे रणबीर कपूर 
रॉकस्टार रणबीर कपूरही खानदानी श्रीमंत आहे. अहवालानुसार, रणबीर कपूर 2021 पर्यंत 330 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. रणबीर कपूर एका चित्रपटासाठी ७ ते ८ कोटी रुपये घेतो. ब्रँड एंडोर्समेंटसाठी देखील रणबीर 1 कोटी रुपये घेतो.

रणबीरकडे आहे कार कलेक्शन
रणबीर कपूरकडे Range Rover Vogue, Audi R8, Mercedes G63 AMG, Audi A8L, Range Rover Sport अशा अनेक कार आहेत. रणबीर त्याची गर्लफ्रेंड आलियापेक्षा श्रीमंत आहे. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कपल पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.