The Kerala Story मधील 'या' अभिनेत्रीचा अपघातामुळे झाला होता स्मृतीभंश

Who Is Sonia Balani From The Kerala Story: सध्या The Kerala Story हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटातील अभिनेत्रींच्या भुमिकेचेही खूप कौतुक केले जात आहे. परंतु या वेळी चर्चा रंगली आहे ती म्हणजे अभिनेत्री सोनिया बलानी हीची. एकेकाळी एका अपघातामुळे तिला आपली स्मृती गमावावी लागली होती. 

गायत्री हसबनीस | Updated: May 23, 2023, 06:00 PM IST
The Kerala Story मधील 'या' अभिनेत्रीचा अपघातामुळे झाला होता स्मृतीभंश title=
फाईल फोटो

Who Is Sonia Balani From The Kerala Story: The Kerala Story या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. हा चित्रपट अल्पावधीच हिट झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला तूफान प्रतिसाद दिला आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटालाही The Kerala Story नं मागं टाकलं आहे. त्यानंतर आलेल्या IB 71 या चित्रपटाचेही बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणावे तेवढे झालेले नाही. एका आठवड्यात 100 कोटी आणि मग 200 कोटी करत कोट्यवधींचा गल्ला भरला आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत असलेली अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले आहे. याशिवाय या चित्रपटातील इतर अभिनेत्रींच्याही अभिनयाचे कौतुक झाले आहे. 

कोण आहे सोनिया बलानी? 

या चित्रपटात अफिसा हे पात्र साकारणारी अभिनेत्री सोनिया बलानी हीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सोनिया बलानी (Sonia Balani) ही मुळची आग्रा, उत्तरप्रदेशची आहे. तिनं अनेक हिंदी मालिकांमधून काम केली आहेत. 2013 साली आलेल्या 'बडे अच्छे लगते हैं' ही मालिका तुम्हाला आठवत असेलच. या मालिकेतील छोट्या पिहूची तिनं भुमिका केली होती. मोठ्या पिहूचा रोल तिनं केला होता. त्यानंतर 'तू मेरा हिरो', 'डिटेक्टिव्ह दीदी' अशा काही लोकप्रिय मालिकांमधूनही तिनं कामं केली आहे. त्यातून तिची 'बडे अच्छे लगते हैं' या (Sonia Balani as Pihu) मालिकेतील भुमिका प्रचंड गाजली होती. पिहूच्या भुमिकेसाठी तेव्हा मोठं ऑडिशनही झालं होतं. 

हेही वाचा - ''ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्यासाठी...'' प्रार्थना बेहेरेच्या Life is Beautiful पोस्टवर नेटकऱ्यांच्या तिरकस प्रतिक्रिया

स्मृती गमावावी लागली होती? 

5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या The Kerela Story या चित्रपटातून तिनं नकारात्मक भुमिका केली आहे. तिच्या या भुमिकेचीही बरीच चर्चा होताना दिसते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की, या अभिनेत्रीला आपली स्मृती गमवावी लागली होती. 2015 साली सोनियाचा एक अपघात झाला होता ज्यामुळे तिला मोठी दुखापत झाली होती. ज्यामुळे तिची स्मृतीही गेली होती. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, अपघाताच्यानंतर तिला दोन दिवसांनी शुद्ध आल्यानंतर ती आपल्या मित्रपरिवार, सहकलाकार आणि कुटुंबियांना ओळखू शकत नव्हती. काही काळासाठी तिची ही स्मृती गेलेली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या The Kerala Story हा चित्रपट विशेष चर्चेत आला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं तगडी कमाई केली आहे. त्याचसोबत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला असून काही दिवसांपुर्वी प्रेस कॉन्फरन्स घेत त्यांनी 26 पीडित मुलांना समोर आणले होते.