'नागीन' फेम अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा, लवकरचं अडकणार विवाह बंधनात

माझं स्वप्न अखेर पूर्ण झालं...  

Updated: Dec 5, 2021, 03:49 PM IST
'नागीन' फेम अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा, लवकरचं अडकणार विवाह बंधनात

मुंबई : झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहात असतान 'नागीन' फेम अभिनेत्री सायंतनी घोषने (Sayantani Ghosh) गुपचूप लग्न केलं आहे. सायंतनीने बॉयफ्रेंड अनुग्रह तिवारीसोबत साखरपुडा केला आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयफ्रेंडसोबत साखपुडा केल्याची माहिती दिली. सायंतनी घोष लवकरच  विवाह बंधनात अडकणार आहे. कोलकातामध्ये हे कपल लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

साखपुड्याच्या फोटोंमध्ये सायंतानी घोष पारंपारिक साडीत दिसत आहे. आयुष्याच्या महत्त्वाच्या दिवशी सायंतानीने लाल रंगाची साडी नेसली आहे.  साडीला साजेसा अभिनेत्रीचा डबल लेयर नेकलेस आणि नॅचरल मेकअपमध्ये ती सौंदर्य आणखी फुलून दिसत आहे. सध्या अभिनेत्रीच्या साखपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री सायंतानी घोषने आज तिच्या गावी कोलकातामध्ये साधेपणाने विवाह होणार आहे. लग्नानंतर दोघांचे रिसेप्शन अनुग्रहच्या होमटाऊन जयपूरमध्ये होणार आहे. अभिनेत्री तिच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे.