Mumbai News : चालू वर्षाची अखेर काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच आता मुंबई शहरातील नागरिकांना नव्यानं काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. शहरातील पाणीपट्टी त्यापैकीच एक. प्राथमिक माहितीनुसार मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या जल अभियंता विभागानं सादर केला आहे. बृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये विविध कारणांनी खर्चाचा भार वाढत असून त्यासाठी ही वाढ गरजेची असल्याची बाब जल अभियंता विभागानं अधोरेखित केली आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो मान्यतेसाठी पुढे पाठवला जाईल. दरम्यान, मागील वर्षी पाणीपट्टीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला नव्हता. पण, नव्या वर्षात मात्र तशी चिन्हं दिसत नसल्यामुळं मुंबईकरांना पाणीपुरवठ्यासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
बाटलीबंद पाणी - 134.64 रुपये
तारांकित हॉटेलं- 95.49 रुपये
उद्योगधंदे, कारखाने- 63.65 रुपये
व्यावसायिक ग्राहक- 47.75 रुपये
बिगर व्यापारी कंपन्या- 25.46 रुपये
घरगुती ग्राहक- 6.36 रुपये
झोपडपट्टी, प्रकल्पबाधिक इमारती- 5.28 रुपये
कोळीवाडे, चाळ, गावठाण- 4.76 रुपये