मोहित सूरीच्या नवीन सिनेमातील कलाकार कोण?

सिनेमात मोहीत सूरी एका नव्या जोडीला चाहत्याच्य़ा भेटीला आणणार आहेत.

Updated: Jan 28, 2019, 07:04 PM IST
मोहित सूरीच्या नवीन सिनेमातील कलाकार कोण?

मुंबई: दिग्दर्शक मोहीत सूरी सध्या एका सिनेमाच्या लेखनाचे काम करत आहेत. लवकरच त्यांचा सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. या सिनेमात मोहीत सूरी एका नव्या जोडीला चाहत्याच्य़ा भेटीला आणणार आहेत. सूत्रांच्या सांगणयानुसार हा सिनेमा एक थ्रिलर ड्रामा असणार आहे. या सिनेमात मोहीत सूरी अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री दिशा पटानी या जोडीला चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी समोर येणार आहे. सिनेमा  रोमँटिक थ्रिलर असेल. सिनेमात आदित्य आणि  दिशा एका प्रेमी युगुलाची भूमिका साकारणार आहेत. सिनेमात एकूण चार पात्रे असणार आहेत. 

Image result for ashiqui 2 zee news

 
मोहीत सूरी  दिग्दर्शित हा सिनेमा पूर्णपणे गोवा या शहरावर आधारित आहे. आदित्य रॉय कपूर आणि मोहीत सूरी या सिनेमाच्या माध्यमातून पून्हा एकत्र येणार आहेत. आदित्य रॉय कपूरने ‘आशिकी 2’या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. ‘आशिकी 2’सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता.