मला निक जॉनसला डेट करायला आवडेल-भूमि पेडणेकर

'कॉफी विथ करण 6' शोमध्ये अनेक खास मंडळी येवून गेले. 

Updated: Jan 28, 2019, 06:08 PM IST
मला निक जॉनसला डेट करायला आवडेल-भूमि पेडणेकर

मुंबई: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 6' शोमध्ये रविवारी अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर उपस्थित होते. प्रश्न-उत्तरांच्या या खेळात करणने दोन्ही कलाकारांना गमतीदार प्रश्न विचारले. दोघांनीही प्रश्नांची अगदी प्रामाणिकपणे उत्तरे दिले. कार्यक्रमावेळी करणने भूमि आणि राजकुमारला, तुम्हाला कोणाला डेट करायला आवडेल असा प्रश्न विचारला. तेव्हा राजकुमारने मला अभिनेत्री दीपिका पादुकोनला डेट करायला आवडले असते, जर तिचे लग्न झाले नसते. त्यानंतर भूमिनेही प्रश्नाचे उत्तर दिले. तिने आपल्याला निक जॉनसला डेट करायला आवडेल असे सांगत तो खूप सुंदर गातो त्याचप्रमाणे तो खूप क्यूट असल्याचे तिने तिच्या उत्तरात सांगितले.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि गायक निक जॉनस हे जोडपे  २ डिसेंबर २०१८ रोजी विवाह बंधनात अडकले. हा शाही विवाह सोहळा उमेद भवन जोधपूर येथे संपन्न झाला.

मागच्या काही दिवसात  'कॉफी विथ करण 6' शोमध्ये अनेक खास मंडळी येवून गेले. शोच्या 6 व्या भागाचे पहिले पाहुणे सारा अली खान आणि सैफ अली खान होते. त्यानंतर अभिषेक बच्चन, शवेता बच्चन, क्र‍िकेटर हार्द‍िक पांडया आणि केएल राहुल हे कलाकार उपस्थित होते.

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर सध्या कलाविश्वात चर्चेत आहेत.  बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरादर देघांनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. भूमि पेडणेकरचा सिनेमा 'सोनचिडिया' लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत झळकणार आहे. 'स्त्री' सिनेमाच्या यशानंतर राजकुमार रावचा 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.