अमिताभ बच्चन यांना विकावी लागली, वडील हरिवंशराय बच्चन यांची आठवण? कारण...

नुकतीच एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये असं सागंतलं जात आहे की, अमिताभ बच्चन जी यांनी त्यांच्या वडिलांची आठवण विकली.

Updated: Feb 4, 2022, 08:34 PM IST
अमिताभ बच्चन यांना विकावी लागली, वडील हरिवंशराय बच्चन यांची आठवण? कारण... title=

मुंबई : अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे एक खूप मोठे आणि प्रसिद्ध अभिनेते आहेत ज्यांनी आतापर्यंत आपल्या आयुष्यात खूप नाव आणि आदर कमावला आहे. अमिताभजींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. इतका काळ उलटला तरी बॉलिवूडमध्ये त्यांचा दबदबा कायम आहे. ज्यामुळे त्यांना संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतर कलाकारांच्या तुलनेत खूप आदर दिला जातो. यासोबत बिग बींनी भरपूर पैसा देखील कमावला. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याकडे आजच्या काळात कशाचीही कमतरता नाही.

परंतु नुकतीच एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये असं सागंतलं जात आहे की, अमिताभ बच्चन जी यांनी त्यांच्या वडिलांची आठवण विकली.

हो अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या दिल्लीमधील बंगला विकला. मीडिया रिपोर्टनुसार हा बंगला बिग बींनी 23 कोटी रुपयांना विकला. ही डिल त्यांनी 7 डिसेंबर रोजी केली.

या सगळ्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, अमिताभ बच्चन जी यांना पैशाची इतकी गरज का होती की त्यांनी आपल्या आई-वडिलांची शेवटची निशाणी ही विकली.

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. कारण त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट आणि सुपरहिट सिनेमे दिले आहेत, ज्यामुळे त्याने सिनेमांमध्ये काम करून खूप कमाई केली आहे. पण तरीही पैशांची कमतरता नसताना अमिताभ बच्चन जी यांनी आई-वडिलांची शेवटची आठवण असलेले घर विकले.

अमिताभ यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांनी या घराचे नाव "सोपान" ठेवले. अमिताभ जींच्या वडिलांचे हे पहिले घर होते जे त्यांनी विकत घेतले होते आणि अमिताभ जींचे बालपणही याच घरात गेले होते. पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांची ही शेवटची आठवण अवघ्या 23 कोटींना विकली.

अमिताभ बच्चन यांनी हे घर विकले कारण, त्या घराची अवस्था खूपच खराब झाली होती आणि यासोबतच या घराला दुरुस्तीचीही नितांत गरज होती. त्यामुळे त्यांनी हे घर विकण्याचा निर्णय घेतला.