मराठी सिनेमासोबतच असं का? मराठी कलाकारांनी वक्त केला संताप

अभिनेता चिन्मय मांडलेकरने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे 

Updated: Nov 21, 2022, 08:08 PM IST
मराठी सिनेमासोबतच असं का? मराठी कलाकारांनी वक्त केला संताप title=

मुंबई : 'झिम्मा' चित्रपटाला मिळालेल्या दमदार आणि भरघोस यशानंतर 'झिम्मा'ची संपूर्ण टीम प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि खास चित्रपट घेऊन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. विविध भावनांनी भरलेला हा चित्रपट पाहून प्रेक्षक या सिनेमाचं भरभरुन कौतूक करत आहेत. हा सिनेमात चित्रपटगृहात तुफान चालतही आहे. मात्र या सिनेमाबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

अभिनेता चिन्मय मांडलेकरने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे जी पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. ही बातमी आहे मराठी सिनेमा बाबत ही पोस्ट शेअर करत चिन्मयने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''इतके दिवस ते म्हणत होते कि लोकंच येत नाहीत. आता बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना मेसेज जातायत की तुमचं बुकिंग कॅन्सल पैसे परत घ्या. 

बनवणाऱ्यांनी चित्रपट बनवला, ज्यांनी पाहिला त्यांना आवडला ही आहे, आणखी लोकांना पाहायचा आहे. मग ही मधली लोकं कोण. काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठी चित्रपट सृष्टीतल्या निर्मात्यांची आवर्जून भेट घेतली होती. आता पुन्हा त्यांच्याचकडे हे गाऱ्हाणं मांडावं का?''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पोस्टमधून कलाकारांनी आपल्या व्यथा सरकारकडे मांडल्या आहेत. सिनेमाची तिकीट काढल्यानंतरही अनेक प्रेक्षकांचे पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आल्यामुळे कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. एवढंच नव्हेतर कलाकारांनी ही पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केली आहे.