नव्या वर्षात 'या' अभिनेत्रीवर मासे विकण्याची वेळ

का आली अभिनेत्रीवर अशी वेळ? 

Updated: Jan 3, 2020, 11:43 AM IST
नव्या वर्षात 'या' अभिनेत्रीवर मासे विकण्याची वेळ  title=

मुंबई : नवं वर्ष 2020 हे सुरू होऊन अवघे काहीसे दिवस झाले आहेत. काहींना हे वर्ष अगदी सुरूवातीपासूनच खास ठरलं तर काहींची नवीन वर्षाची सुरूवात ही अतिशय खडतर झाली आहे. सध्या मराठमोळ्या अभिनेत्रीची तिच्या पोस्टमुळे जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीवर चक्क मासे विकण्याची वेळ आली आहे. 

फॅशन स्टाईलमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री मानसी नाईक तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. मासोळी बाजारात चक्क मानसी मासे विकताना दिसत आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तिच्यावर मासे विकण्याची नेमकी वेळ का आली? यावर आता चर्चा रंगली आहे. (छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे अभिनेत्रीचं सिनेमात पदार्पण) 

 

या फोटोत मानसीने साई नेसली असून हातात मोठी सुरमई पकडली आहे. सनडे मार्केटला माझ्या मासोळीचा भाव रापचिक होणार असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आहेत. तिचा हा लूक नव्या अल्बमसाठी असल्याचं समोर आलं आहे. नवीन व्हिडिओ अल्बम घेऊन मानसी लवकरच प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. या अल्बमची निर्मिती सागरिका म्युझिकने केली असून हे गाणं कोळीगीत असून 12 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे.