Saif Ali Khan Amrita Singh Affair: ..म्हणून सैफसोबत लग्नासाठी अमृताच्या घरच्यांचा होता नकार

सैफ आणि अमृता सिंगचा प्रेम विवाह असूनही का झाला घटस्फोट 

Updated: Jan 11, 2022, 06:37 PM IST
Saif Ali Khan Amrita Singh Affair: ..म्हणून सैफसोबत लग्नासाठी अमृताच्या घरच्यांचा होता नकार title=

मुंबई : Saif Ali Khan Amrita Singh Marriage: अमृता सिंग (Amrita Singh) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan)यांची पहिली भेट फिल्ममेकर राहुल रवैल यांच्या सिनेमाच्या सेटवर झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमृता सिंगला पाहताच क्षणी सैफ तिच्या प्रेमात पडली. यानंतर सैफने अमृताला डेटवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमृता सिंगने डेटवर बाहेर येण्यास मनाई केली. पण तिनेच सैफला आपल्या घरी जेवायला बोलवलं. 

बातमीनुसार, सैफ अली खानने येथे पहिल्या भेटीत अमृता सिंगला प्रपोजही केले होते. मात्र, अमृता सिंग वयाने सैफ अली खानपेक्षा खूप मोठी होती. सैफ आणि अमृताच्या वयात १२ वर्षांचा मोठा फरक होता. याच कारणामुळे सैफ अली खानच्या कुटुंबीयांचा अमृता सिंगसोबतच्या लग्नाला कडाडून विरोध होता. मात्र, सैफने निर्णय घेतला आणि कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध जाऊन 1991 मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केले.

लग्नाच्या वेळी अमृता सिंग 33 वर्षांची होती, तर सैफ तेव्हा 21 वर्षांचा होता. इतकेच नाही तर अमृता त्यावेळची इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती, तर सैफने तेव्हा चित्रपटांमध्ये पदार्पणही केले नव्हते. मात्र, या लग्नापासून सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले झाली.

त्याच वेळी, लग्नाच्या काही वर्षानंतर, सैफ आणि अमृता यांच्यातील मतभेद  इतके वाढले की 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सैफपासून घटस्फोट घेतल्यानंतर अमृताने दुसरे लग्न केले नाही. तर सैफ अली खानने 2012 मध्ये अभिनेत्री करीना कपूर खानशी लग्न केले.