शाहरुख नेमकं काय म्हणाला की, दिलजीत दोसांझ झाला चकित; Chamkila सोबत किंग खानचं खास कनेक्शन

अभिनेता दिलजीत दोसांझच्या 'चमकिला' सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. अमर सिंह यांची भूमिका साकारणाऱ्या दिलजीतला हा सिनेमा कसा मिळाला. याचा किंग खान शाहरुखशी काय संबंध आहे? ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 16, 2024, 02:09 PM IST
शाहरुख नेमकं काय म्हणाला की, दिलजीत दोसांझ झाला चकित; Chamkila सोबत किंग खानचं खास कनेक्शन title=

इम्तियाज अली दिग्दर्शित 'चमकिला' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. दिलजीत दोसांझ आणि परिणिती चोप्रा या सिनेमात अमर सिंह चमकिला आणि अरमज्योत कौर यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाने खूप कमी दिवसांत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या सिनेमाची टिम कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. यावेळी इम्तियाज अलीने दिलजीत दोसांझला 'चमकिला' सिनेमातील अमर सिंहची भूमिका कशी मिळाली याचा खुलासा केला आहे.

शाहरूख कनेक्शन 

शाहरुखने एकदा दिलजीतला भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटले होते, असा खुलासा इम्तियाजने नेटफ्लिक्सवरील कपिल शर्मा शोमध्ये केला आहे. त्याच्या कौतुकाने प्रभावित होऊन दिग्दर्शकाने दिलजीतला हा चित्रपट ऑफर केला.इम्तियाजने असेही सांगितले की, जर दिलजीतने ही व्यक्तिरेखा साकारण्यास होकार दिला नसता तर कदाचित हा चित्रपट कधीच बनला नसता.

शाहरुखचे कौतुक करताना दिलजीत म्हणाला

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

गेल्या शनिवारी कपिल शर्माच्या नवीन शोमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अली, परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ सहभागी झाले होते. यादरम्यान कपिलने दिग्दर्शकाला दिलजीतला कास्ट करण्याचे कारण विचारले.  त्यावर इम्तियाज म्हणाला- एकदा शाहरुख खानने मला सांगितले की, दिलजीत हा देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. या भूमिकेसाठी दिलजीतच योग्य अभिनेता आहे. 

दिलजीतने होकारामुळे झाला हा सिनेमा 

शाहरूख खानने आपल्याबाबत केलेलं हे वक्तव्य दिलजीतसाठी नवीन होतं. त्याने या उत्तर अपेक्षा अजिबातच केली नव्हती. त्यावर दिलजीत म्हणाला की, कदाचित तो मूडमध्ये असेल. इम्तियाज पुढे म्हणाला की, जर दिलजीतने ही भूमिका करण्यास नकार दिला असता तर कदाचित हा चित्रपट बनला नसता. आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला परिणीती आणि दिलजीत पेक्षा चांगले कलाकार सापडले नसते.

काय आहे सिनेमाची गोष्ट?

‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट 80 च्या दशकातील पंजाबचा प्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये दिलजीत दोसांझने 'अमर सिंह चमकीला'ची भूमिका साकारली आहे. तर परिणीती चोप्रा अमरजोत कौरच्या भूमिकेत दिसली आहे. अमर सिंह चमकीला आपल्या गायनाने प्रसिद्धीच्या शिखरावर कसे पोहोचले आणि पंजाबी संगीत उद्योगावर 10 वर्षे राज्य केले, परंतु लवकरच अमर सिंह आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.