मुंबई : बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून अभिनेत्री सोनम कपूरची ओळख आहे. फॅशन फ्रिक अभिनेत्रीत सोनमचे स्थान जरा वरचेच आहे. काही महिन्यांपूर्वी सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत धुमधडाक्यात विवाहबद्ध झाली. पण सोनमने आनंद आहुजाशीच लग्न का केले? याचे उत्तर तिने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर दिले आहे. अर्थात प्रेम हे एक कारण आहेच. पण याशिवायही अजून एक कारण आहे. ज्याचा उलघडा खुद्द सोनमने केला आहे.
वोग इंडिया मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सोनमने तिचे फॅशनप्रेम जाहिर केले. मी फॅशनवर जितके प्रेम करते, तितके प्रेम कुणीच करु शकत नाही, असे तिचे म्हणणे आहे. या फॅशनप्रेमापोटीच तिने आनंद आहुजाशी लग्न केले असल्याचे तिने सांगितले. यासंदर्भात तिने एक पोस्टही केली आहे. त्यात आनंदला टॅग करत तिने लिहिले, ''होय, आनंद फॅशन आणि रिटेलशी जुळलेला आहे, म्हणून मी त्याच्यासोबत लग्न केले.'' यासोबत सोनमने खास व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात ती वेगवेगळ्या पोजेस देताना दिसत आहे.
Yup! I even married someone in fashion and retail @anandahuja https://t.co/1xVLqGDgUZ
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) July 17, 2018
आनंद अहुजा हा दिल्लीतील एका शूज ब्रॅन्डचा मालक आहे. दोघांची करियर वेगवेगळी असली तरीही अनेक ठिकाणी त्यांची पसंत जुळते. आनंद हा ३ हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. आनंदचे शिक्षण अमेरिकेत झाले असून तो ब्रॅँड Bhane चा मालक आहे आणि तोच सोनमचा आवडता ब्रॅंड आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.