..यामुळे करिना सैफला किस करणं टाळते

कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का 

..यामुळे करिना सैफला किस करणं टाळते title=

मुंबई : बॉलिवूडमधील सैफ करीना यांच्या अफेअर आणि नंतर लग्नाची चोरदार चर्चा होती. अनेकदा जिथे लोकांच प्रेम लग्नानंतर गायब होतं, तिथे सैफीनाची जोडी मात्र आपल्या केमिस्ट्रीमुळे अधिकच चर्चेत आली. मात्र हल्ली सैफ अली खानने एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं आहे की, त्याची पत्नी म्हणजे अभिनेत्री करिना आता सैफला किस करत नाही. याचं कारण वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. 

करिना - सैफ का नाही करत किस?

सैफने एका कार्यक्रमात सांगितलं की, तो एक वेब सिरीज करत आहे. ज्यामध्ये त्याला दाढी वाढवणं गरजेतं आहे. या सेक्रेड गेम्स या वेब सिरीजसाठी सैफने खरी दाढी वाढवली आहे. यामध्ये तो पंजाबी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत होता. यामुळे दाढी वाढवलेल्या सैफला करिनाच काय तर तैमूर देखील किस करत नव्हता. 

एवढंच काय तर सैफचे भारताबाहेर राहणारे मित्र देखील त्याला काय 'हिप्पी' होत असे असे प्रश्न विचारत आहे. सैफने सांगितलं की, हल्ली तैमूर त्याच्या हातावर किस करतो. जर तैमूरला किस करायला सांगितल तर तो माझ्या दाढीजवळ आपलं डोकं आणतो असं हसत हसत सैफ सांगतो.