मुलांसाठी हृतिक - सुझैन घेणार मोठा निर्णय

काय करणार दोघं?

मुलांसाठी हृतिक - सुझैन घेणार मोठा निर्णय  title=

मुंबई : आपल्याला माहित आहे हृतिक रोशन आणि सुझैन यांनी 2014 मध्ये घटस्फोट घेतला आहे. घटस्फोट घेतल्यानंतरही हे दोघे अनेकदा एकत्र दिसले. कायमच या दोघांचा असा स्टँड असतो की, आपल्या घटस्फोटाचा परिणाम आपल्या दोन्ही मुलांवर होता कामा नये. आणि यासाठी ते खास प्रयत्नशील असतात. 

यामुळेच अनेकदा हृतिक आणि सुझैन आपल्या मुलांसोबत कधी व्हॅकेशनवर, तर कधी मुव्ही डेटला तर कधी डिनर डेटवर एकत्र दिसले. मात्र आता हृतिक आणि सुझैन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण हृतिक आणि सुझैन पुन्हा एकदा लग्न करत असल्याचं दिसत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीमधून, हृतिक आणि सुझैन पुन्हा एकदा फक्त मुलांसाठी एकत्र येणार आहे. दोघांनी लग्नाकरता पुन्हा एकदा विचार केला आहे. या अगोदरही या दोघांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती. मात्र त्या दोघांनी कोणताही खुलासा केला नव्हता. आता पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या आपल्या अपकमिंग सिनेमा 'सुपर 30' च्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचं कळत आहे. तसेच या शुटिंगमधून वेळ काढून तो मुलं आणि सुझैनसोबत पिकनिकला जाताना दिसत आहे. घटस्फोट घेतल्यानंतरही दोघं फक्त मुलांसाठी एकत्र येताना दिसतात.