वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद?

सोनी टीव्हीवरील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका बंद करण्यात आल्याचे समजते. या मालिकेचा एपिसोड काल (२८ ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही. त्यामुळे ही मालिका बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.  मालिकाच बंद झाल्याने कलाकारांना झटका बसला आहे.

Updated: Aug 29, 2017, 12:35 PM IST
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद? title=

मुंबई : सोनी टीव्हीवरील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका बंद करण्यात आल्याचे समजते. या मालिकेचा एपिसोड काल (२८ ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही. त्यामुळे ही मालिका बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.  मालिकाच बंद झाल्याने कलाकारांना झटका बसला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मालिकेच्या निर्मात्यांनीच शूटिंग थांबवलं आहे. निर्माते माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयाची वाट बघत आहे. त्यानंतरच या मालिकेचं भविष्य ठरवलं जाणार आहे. 

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चॅनलने ही मालिका बंद केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मालिकेतील कलाकार जीतेन लालवाणी याच्याशी संपर्क साधला असता, एपिसोड दाखवला नाही म्हणजे ही बातमी खरी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. एका १८ वर्षांच्या तरुणीचं ९ वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. इतकेच नाही तर ‘पहरेदार पिया की’ मालिकेविषयी रोष निर्माण झाल्याने मानसी जैन नावाच्या एका तरुणीने change.org वेबसाईटवर याचिका दाखल केली होती. 

ही मालिका तातडीने बंद करा अशी मागणी या याचिकेद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर स्मृती इराणी यांनी मागणीचा विचार करत ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्पलेंट्स काऊन्सिलकडे हे प्रकरण सोपवून बीसीसीसीला या मालिकेवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला होता. आता ही मालिकाच बंद करण्यात आली आहे.