'फ्रेण्ड्स' मालिकेतून जगाला हसवणाऱ्या मॅथ्यू पेरीची धक्कादायक एक्झिट, घरातल्या हॉट टबमध्ये आढळला मृतावस्थेत

Actor Matthew Perry Passed Away: अभिनेता मॅथ्यू पेरी हा 54 वर्षांचा होता. शनिवारी लॉस एंजेलिस-क्षेत्रातील एका घरातील हॉट टबमध्ये तो मृतावस्थेत आढळला.

Pravin Dabholkar | Updated: Oct 29, 2023, 09:40 AM IST
'फ्रेण्ड्स' मालिकेतून जगाला हसवणाऱ्या मॅथ्यू पेरीची धक्कादायक एक्झिट, घरातल्या हॉट टबमध्ये आढळला मृतावस्थेत title=

Actor Matthew Perry Passed Away: नव्वदीच्या शतकातील किड्ससाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला हसवणारा, मनोरंजन करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. 1990 च्या दशकात यूएस टेलिव्हिजन कॉमेडी 'फ्रेंड्स' खूपच चर्चेत होता. यामध्ये अभिनेता मॅथ्यू पेरीने मुख्य भूमिका साकारली होती. यामुळे मॅथ्यूला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. 

अभिनेता मॅथ्यू पेरी हा 54 वर्षांचा होता. शनिवारी लॉस एंजेलिस-क्षेत्रातील एका घरातील हॉट टबमध्ये तो मृतावस्थेत आढळला.

मॅथ्यू पेरी हा विनोदी नट आणि निर्माताही आहे. 'फ्रेंड्स'  या मालिकेमुळे मॅथ्यू पेरी जागातील घराघरात पोहोचला. मॅथ्यू पेरीने मालिकांसोबत अनेक सिनेमांतून दिसला. त्याने केलेल्या सिनेमांच्या यादीत 'फूल्स रश इन', 'ऑलमोस्ट हीरोज', 'द होल नाइन यार्ड्स', '17 अगेन' आणि 'द रॉन क्लार्क स्टोरी' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

रॉयटर्सने एलए टाईम्सच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नव्वदीच्या दशकातील मुलांना हॉलिवूड स्टार मॅथ्यू पेरी हे नाव नवे नाही. भारतात टेलिव्हिजन मालिकांचा उदय होत असताना 'फ्रेण्ड्स' प्रत्येकाच्या मनात घर केले होते. मॅथ्यू पेरीचा हसरा चेहरा प्रत्येकाच्या मनात बसला. त्याचे अनेक फोटो आजही व्हायरल होत असतात. 19 ऑगस्ट 1969 रोजी विलियमस्टाउन येथे जन्मलेल्या मॅथ्यू पेरीची आई सुजैन मैरी मॉरिसन पत्रकार आहे. तर त्याचे वडील जॉन बेनेट पेरी हेदेखील हॉलिवूडचे अभिनेते होते. पण  आईवडील विभक्त झाल्यानंतर मॅथ्यूला मोठा धक्का बसला. यानंतर त्याच्या आईने पत्रकार कीथ मॉरिसनसोबत संसार सुरु केला.