अभिनेत्री यामी गौतमने लग्नात महागडा मेकअप टाळला, तरीही सुंदर दिसण्याचं हे आहे गुपित

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं नुकतंच लग्न केलं आहे. अचानक झालेल्या लग्नाच्या बातमीने बऱ्याच चर्चा झाल्या. 

Updated: Jun 28, 2021, 05:37 PM IST
अभिनेत्री यामी गौतमने लग्नात महागडा मेकअप टाळला, तरीही सुंदर दिसण्याचं हे आहे गुपित

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने नुकतंच लग्न केलं आहे. अचानक झालेल्या लग्नाच्या बातमीने बऱ्याच चर्चा झाल्या. यामीच्या साध्या सोबर वेडिंग लूकचंही खूप कौतुक केलं गेलं. पण यामीने या लूकसाठी काही खास खर्च केला नाही असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर तुम्हाला कसं वाटेल? आपल्याला असं वाटेल की, लग्नांमध्ये लोकं मेक-अप आणि कपड्यांवर खूप खर्च करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते बॉलीवूडचं लग्न होतं, मात्र असं असलं तरी, यमीने स्वत:साठी वेगवेगळ्या गोष्टी आखल्या होत्या.

घरीच तयार झाली यामी 
यामी गौतमने कोणताही मोठा डिझायनर लेहंगा न घातला तिने आपल्या आईची जुनी लाल साडी परिधान केली होती. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, यामीने घरीच मेक-अप केला, ती कोणत्याही पार्लरमध्ये गेली नाही. तिची बहीण सुरीलीने तिला तयार केलं होतं. याचा व्हिडिओ तिने स्वत: शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत यामीने यामागचं खरं कारणही सांगितलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

यामीने लिहिली खास पोस्ट 
यामी गौतमने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'वन मॅन आर्मी ... शहरातील लॉकडाऊनमुळे एका तासाच्या आत लग्नाची खरेदी केली, माझ्या हाताला जे लागलं ते घेऊन आले. माझी हेअर स्टाईल करण्यापासून, मला हवा असलेला सुंदर पारंपारिक लुक देण्यापर्यंत. तुमच्या विनोदांबरोबर माझं नेहमीच मनोरंजन केल्याबद्दल, मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, जेणेकरून मी एक मिनिटही नाराज होऊ नये. चहा पिण्याच्या सेशन बद्दल, घरी स्वादिष्ट केक्स बनवल्या बद्दल आणि बरंच काही केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

सर्वांना सांगितलं - धन्यवाद
यामी गौतमने पुढे लिहिलं आहे की, ' असा परिवार जो तुमच्यावर बिनाशर्त, मजबूत मिडिल क्लास वॅल्यू आणि परंपरा यासाठी मला खूप लकी फिल करते. या सगळ्या गोष्टींसाठी मी जगातील सगळ्या गोष्टी सोडू शकते. प्रेम आणि आदराबद्दल धन्यवाद. ' यामी गौतमने याचासोबत एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती लग्नासाठी तयार होताना दिसत आहे.