Ye Re Ye Re Paisa 3 : मराठी चित्रपटसृष्टीत 'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट मल्टिस्टारर ठरला आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा 'ये रे ये रे पैसा 3' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सीक्वेल आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे.
आता हा चित्रपट 3 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळं काही तरी पाहायला मिळणार. काहीतरी हटके असेल ज्याची आपण अपेक्षा ही केली नसेल. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून एक वेगळा असा अनुभव पाहायला मिळतो. 'ये रे ये रे पैसा' आणि 'ये रे ये रे पैसा 2' या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळी, मनोरंजक होणार आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे. त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची जुगलबंदीही पाहता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी 'ये रे ये रे पैसा 3' सज्ज होत आहे.
हेही वाचा : अखेर 'हेरा फेरी 3' येणार! पण, इतका उशीर का झाला? निर्मात्याला का मोजावे लागले 60 कोटी?
अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून भेटीस येणार आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.