मालविकाने घेतला 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचा निरोप?

 स्वत:चा एक फोटो शेअर करत मालविकाने आपण सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यात यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नसताना आता अदितीचा एक न्यू हेअर लूकमधील फोटो समोर आला आहे. 

Updated: Jun 27, 2021, 04:08 PM IST
मालविकाने घेतला 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचा निरोप? title=

मुंबई |  छोट्या पडद्यावरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेने फार कमी वेळात आपला मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. सध्या घरघरात पोहोचलेल्या या मालिकेने इतर मराठी मालिकांचं ही मार्केट देखील डाऊन केलं आहे.. त्यात या मालिकेतील प्रत्येक पात्राला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय. ओम- स्वीटूची केमिस्ट्री असो ,किंवा मग शकू आणि नीलूची मैत्री प्रेक्षक मालिकेतील प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम देत आहेत.

त्यात या मालिकेत मालविकाचं दमदार असं खलनायिकी पात्र साकारणारी अभिनेत्री अदिती सारंगधर देखील कमालीची चर्चेत असते..सोशल मीडियावर देखील या मालविकाचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र काही दिवसांपूर्वी अदितीने सोशल मीडियाला राम-राम ठोकल्याचं समोर आलं.

 

 स्वत:चा एक फोटो शेअर करत मालविकाने आपण सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यात यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नसताना आता अदितीचा एक न्यू हेअर लूकमधील फोटो समोर आला आहे. 

या फोटोत मालविकाने नवीन हेअर स्टाईल केल्याचं दिसतंय. तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज या फोटोमध्ये पाहायला मिळतोय.पण मालविकाच्या या नव्या लूकमधील फोटोमुळे तिने 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचा निरोप घेतला आहे का ? अशी चर्चा सध्या जोर धरतेयं..

आधी सोशल मीडियावरील ब्रेक आणि त्यानंतर नव्या लूकमधील पोस्ट पाहून मालविका नव्या प्रोजेक्टच्या तयारीत आहे का असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाये. आता हा लूक याच मालिकेचा भाग आहे की आगामी एखाद्या प्रोजेक्टसाठी मालविकाने हा बदल केला आहे, हे लवकरच समोर येईल यात शंका नाही.